प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आता जादा वेळ!

By admin | Published: January 9, 2015 01:16 AM2015-01-09T01:16:54+5:302015-01-09T01:16:54+5:30

विद्यार्थीहिताचा विचार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी केल्या.

Extra time to read the question paper! | प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आता जादा वेळ!

प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आता जादा वेळ!

Next

पुणे: दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आगोदर प्रश्नपत्रिका देता येईल का? त्याचप्रमाणे घराजवळील परीक्षा केंद्र त्यांना देणे शक्य आहे का, असा विद्यार्थीहिताचा विचार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी केल्या.
शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तावडे
यांच्या हस्ते आॅनलाईन डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात
आले. तावडे म्हणाले, दहा
मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली
तर गोंधळलेल्या विद्यार्थ्याला
शांतपणे विचार करता येईल.
कोणत्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येतात, कोणते प्रथम सोडवावेत यासंदर्भातील नियोजन करता येईल. त्याचप्रमाणे घरापासून परीक्षा केंद्र दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षेच्या दिवशी धावपळ करत केंद्रावर पोहचावे लागते.
त्यात रिक्षा, रेल्वे यांचे संप अशा अडचणी देखील येतात. त्यामुळे विद्यार्थी ज्या परिसरात राहतो, त्याच परिसरातील परीक्षा केंद्रावर त्याला परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
तसेच विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची आवड आहे, हे तपासण्यासाठी त्याची कलचाचणी घेऊन पालकांना त्यासंदर्भात माहिती द्यावी, असा विद्यार्थी हिताचा विचार राज्य शिक्षण मंडळाने करावा, असे ते म्हणाले.

च्विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा दप्तराचा भार कमी करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून ती ‘तमिळनाडू पॅर्टन’चा अभ्यास करणार आहे, असे विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पहिल्या सत्रात भाषा विषयाची कोणती व किती पुस्तके विद्यार्थ्यांनी शाळेत आणावीत.
च्या पुस्तकांची रचना कशी असावी. तर दुसऱ्या सत्रात काय रचना असेल, तीन किंवा किंवा सहा महिन्यांच्या कालावधीत ठराविक पुस्तके शाळेत आणण्याबाबत काही धोरण निश्चित करता येऊ शकते का? अशा सर्व बाबींचा विचार करून ही समिती शासनाला आपला अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Extra time to read the question paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.