ठाणे, पालघरच्या प्रभारींची हकालपट्टी

By admin | Published: December 6, 2014 02:49 AM2014-12-06T02:49:03+5:302014-12-06T02:49:03+5:30

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सपाटून मार खाल्ल्यानंतर प्रदेश काँगे्रसने ठाणे ग्रामीणसह पालघर आणि कल्याण जिल्ह्यातील आपल्या संघटनात्मक प्रभारींची हकालपट्टी केली आहे़

Extraction of in-charge in Thane, Palghar | ठाणे, पालघरच्या प्रभारींची हकालपट्टी

ठाणे, पालघरच्या प्रभारींची हकालपट्टी

Next

नारायण जाधव, ठाणे
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सपाटून मार खाल्ल्यानंतर प्रदेश काँगे्रसने ठाणे ग्रामीणसह पालघर आणि कल्याण जिल्ह्यातील आपल्या संघटनात्मक प्रभारींची हकालपट्टी केली आहे़ संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने नव्या नियुक्त्यांमध्ये प्रभारींच्या जोडीला सहप्रभारी देण्यात आले आहेत़
यानुसार ठाणे ग्रामीण काँगे्रसचे विद्यमान प्रभारी दयानंद चोरघे यांची हकालपट्टी करण्यात आली असून नवे प्रभारी म्हणून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यशवंत हाप्पे आणि सहप्रभारी म्हणून पक्षाचे सचिव चंद्रकांत गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ पालघर जिल्हा काँगे्रसचे प्रभारी मनीष गणोरे यांनाही नारळ देण्यात आला असून त्यांच्या जागी नवे प्रभारी म्हणून पक्षाचे सरचिटणीस राजेश शर्मा आणि सहप्रभारी म्हणून प्रकाश सोनवणे यांना धाडण्यात आले आहे़ अशाच प्र्रकारे कल्याणचे प्रभारी सचिन पोटे यांच्या जागी नवे प्रभारी म्हणून प्रदेश काँगे्रसचे सरचिटणीस असलेले ठाण्यातील जुने निष्ठावान काँगे्रस कार्यकर्ते संजय चौपाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे चौपाने यांच्या जोडीला सहप्रभारी देण्यात आलेला नाही़

Web Title: Extraction of in-charge in Thane, Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.