येत्या २४ तासांत कोकणात अतिवृष्टी तर, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:17 PM2020-06-16T21:17:27+5:302020-06-16T21:29:00+5:30
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस
पुणे : कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या २४ तासात कोकणातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात कोकणात मंडणगड, राजापूर १६०,मार्मागोवा १५०, सावंतवाडी १३०, दाभोलीम, दापोली १२०, लांजा, पेडणे,संगमेश्वर, देवरुख ११०, मडगाव १००, चिपळूण, रामेश्वर ९०, गुहागर, खेड ८०,कानकोण, कणकवली, मालवण, केपे, श्रीवर्धन, वेंगुर्ला ७०, म्हापसा ६०,दोडामार्ग, खालापूर, कुडाळ, माथेरान, मुंबई (कुलाबा), वाल्पोई ५०, कर्जत,म्हसळा, मोखेडा ४० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, राहुरी ११०, येवला ८०, लोणावळा, राधानगरी ७०, महाबळेश्वर ६०, रावेर ५०, चंदगड, जामनेर, मुक्ताईनगर, ओझरखेडा,पन्हाळा, शेवगाव ४०, आंबेगाव घोडेगाव, कोपरगाव, पाथर्डी, शाहूवाडी ३० मिमी पाऊस पडला.
मराठवाड्यातील पाथरी ८०, भोकरदन ७०, गेवराई, जफराबाद ६०, गंगापूर, माजलगाव, पैठण ५०, आंबेजोगाई, फुलंब्री, उमारी ४०, अर्धापूर, लातूर,पालम, परभणी, पूर्णा ३०, आष्टी, बदनापूर, बीड, देगलूर, हिंगोली,खुलताबाद, मानवत, मुखेड, रेणापूर, सिल्लोड, सोयेगाव, वैजापूर २० मिमीपावसाची नोंद झाली.
विदर्भातील पौनी १३०, लाखनी ७०, देसाईगंज ६०, आरमोरी, भंडारा, भिवापूर ५०, ब्रम्हपुरी, देवरी, घाटंजी, कळंब, कारंजालाड, सडक अर्जुनी, साकोली,सेलू ४०, अकोला, आर्वी, भामरागड, बुलढाणा, चांदूरबाजार, एटापल्ली, हिंगणा, जळगाव जामोद, कंपटी, कोरची, कुही, मलकापूर, मौदा, मेहकर, मलू,चेरा, नंदूरा, नेर, पर्सेओनी, राळेगाव, संग्रामपूर, शेगाव, तिवासा,यवतमाळ ३० मिमी पाऊस पडला़ याशिवाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला.
घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) ९०, लोणावळा, भिवपूरी ७०, वळवण, खंद ६०,शिरोटा, खोपोली ५०, शिरगाव, वाणगाव ४०, ठाकूरवाडी, डुंगरवाडी, कोयना(नवजा), भिरा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर ४६, मालेगाव २४, मुंबई१४, रत्नागिरी २४, पणजी ९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.राज्यात १७ जून रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १८ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.