पुणे मेट्रोचा बालेवाडीच्या १५ एकर जागेवर डोळा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:30 AM2017-08-11T03:30:31+5:302017-08-11T03:30:36+5:30

पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही बालेवाडी येथील १५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. सुमारे १५ एकर जागा असून झपाट्याने विकसित होत असलेल्या आयटी उद्योगामुळे या जागेला सोन्याचे मोल आहे.

Eye on 15 acres of Balewadi in Pune Metro | पुणे मेट्रोचा बालेवाडीच्या १५ एकर जागेवर डोळा  

पुणे मेट्रोचा बालेवाडीच्या १५ एकर जागेवर डोळा  

Next

पुणे : पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही बालेवाडी येथील १५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. सुमारे १५ एकर जागा असून झपाट्याने विकसित होत असलेल्या आयटी उद्योगामुळे या जागेला सोन्याचे मोल आहे. मेट्रोपाठोपाठ आता पीएमआरडीनेही आपल्या कार्यक्षेत्रात ही जागा येत असल्याने आपल्यालाच मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.
पुणे मेट्रो आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्र्राधिकरण या दोघांनी या बालेवाडी येथील सरकारी १५ एकर जागेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, येथे दोन्ही मेट्रोचे स्थानक, डेपो अथवा मेट्रोसंदर्भातील कोणतेही बांधकाम करणार नाहीत. या सरकारी जागेवर पीपीपी मॉडेलद्वारे (पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिप) व्यावासायिक संकुल उभे करून निधी उभारण्यात येणार आहे. या जागेसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या वतीने मेट्रो कार डेपो, मेट्रो स्थानक, कर्मचाºयांसाठी निवासस्थान व कार्यालयांसाठी जागा आणि मेट्रो डेपोसाठी पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय, शासकीय धान्य गोदाम, कोथरूड येथील शिवसृष्टीसाठी राखीव असलेली आणि बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोचा मार्ग व अथवा कार्यक्षेत्र या भागात नसतानादेखील झपाट्याने विकसित होत असलेल्या व आयटी पार्कमुळे प्रचंड मागणी असलेल्या बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे. दरम्यान पीएमआरडीएच्या वतीनेदेखील बालेवाडी येथील जागा आपल्या कार्यक्षेत्रात येत असून, भविष्यात या परिसरात मेट्रो येऊ शकते. ही जागा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. सध्या विकासकामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने जागा विकसित करून निधी उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठीच पुणे मेट्रो आणि पीएमआरडीए या दोघांनीदेखील अत्यंत मोक्याच्या बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील विविध संस्थांनी जमीन वापराच्या नियमांचे शर्तभंग केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक वर्षांपूर्वी अनेक संस्थांकडून जागा काढून घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेला बालेवाडी येथे १५ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले होते. या संस्थेने जागेचा वापरच न केल्याने ही जमीन काढून घेण्यात आली असून, पुन्हा सरकारजमा करण्यात आली आहे. तेव्हापासूनच या जागेवर डोळा आहे.

Web Title: Eye on 15 acres of Balewadi in Pune Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.