एफ नॉर्थ वॉर्ड : उत्तर भारतीय मतांसाठी भाजपा काँगेसमध्ये स्पर्धा

By admin | Published: December 29, 2016 12:38 PM2016-12-29T12:38:50+5:302016-12-29T14:51:51+5:30

एफ नॉर्थ म्हणजे पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी अशा सधन लोकवस्तीपासून जिथे नजर टाकावी तिथे झोपड्या अशा अँटॉप हिल परिसराचा समावेश असणारा वॉर्ड.

F North Ward: Contest in BJP Congress for North Indian votes | एफ नॉर्थ वॉर्ड : उत्तर भारतीय मतांसाठी भाजपा काँगेसमध्ये स्पर्धा

एफ नॉर्थ वॉर्ड : उत्तर भारतीय मतांसाठी भाजपा काँगेसमध्ये स्पर्धा

Next
>युतीसाठी ‘एकीचे बळ’च विजयाची हमी 
- गौरीशंकर घाळे
मुंबई : एफ नॉर्थ म्हणजे पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी अशा सधन लोकवस्तीपासून जिथे नजर टाकावी तिथे झोपड्या अशा अँटॉप हिल परिसराचा समावेश असणारा वॉर्ड. वॉर्डातील प्रत्येल प्रभागाची स्वतंत्र ओळख, स्वतंत्र राजकीय आणि सामाजिक गुंतागुंत इथे पाहायला मिळते. तोच प्रकार येथील नागरिक समस्यांचा. बहुरंगी आणि बहुढंगी अशा या वॉर्डातील छोटे-छोटे समूह स्वत:कडे राखणे प्रत्येक उमेदवारासमोरील मोठे आव्हान असणार आहे. 
मागील महापालिका निवडणुकीत या वॉर्डातील चार प्रभागांवर शिवसेना, दोन ठिकाणी भाजपा, दोन जागांवर कॉंग्रेस तर बसपा आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला होता. शिवसेनेला स्वाभाविकपणे आपल्या संघटनात्मक रचनेचा इथेही फायदा होणार आहे. काही अपवाद वगळता एखादी व्यक्ती अथवा चेह-यावर शिवसेनेचे मुंबईतील राजकारण अवलंबून नाही. शाखाशाखांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पर्याय उपलब्ध असल्याने आरक्षणाचा फटका सहसा जाणवत नाही. मराठी, दक्षिण आणि उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजाचे कप्पे या वॉर्डात पाहायला मिळतात. मोदी लाटेनंतर भाजपाची येथील ताकद वाढली आहे. शिवाय उत्तर भारतीय मतांवरही भाजपाची आशा आहे. मात्र, गेल्या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे गेलेल्या युतीने सहा जागांवर कब्जा केला होता. यंदा स्वबळाच्या डरकाळ्या फुटत असल्या तरी या वॉर्डात त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे. 
काँग्रेस ब-याच प्रमाणात उत्तर भारतीय मतदारावर विसंबून आहे. उत्तर भारतातील राजकारणाचा थेट परिणाम येथील उत्तर भारतीय जनमानसावर होत असतो. त्यामुळे काँग्रेसला जास्तीची मेहनत करावी लागणार आहे. शिवाय हक्काच्या मुस्लिम मतांमध्ये एमआयएममुळे फुट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसपा आणि रिपब्लिकन गटातील मनोज संसारे यांच्याकडे प्रत्येकी एक एक जागा आहे. त्यातील बसपाचा जागा पक्षापेक्षा उमेदवारावर अवलंबून होती. यंदा सत्ताधारी भाजपा शिवसेना त्याचा लाभ घेवू शकते. एकेकाळी शक्तीशाली असणारे मनोज संसारे काहीसे बाजूला फेकले गेल्याचे चित्र आहे. आपले वर्चस्व राखण्यासाठी त्यांना भरीच मेहनत करावी लागणार आहे. 
--------------------------
पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी हा सधन पट्टा मधल्या काळात हेरिटेजच्या कचाट्यात सामडला होता. त्यातून कशीबशी सुटका झाली असली तरी बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे बहुतांश इमारतींच्या पुर्नविकासाचे प्रकल्प रखडले आहेत. काही ठिकाणी तर आठ वर्षापासून प्रकल्प तसाच तखडल्याने रहिवाशांच्या माथी लांबलेले विस्थापन आले आहे तर अनेक जीर्ण इमारतींच्या पर्नुविकासाठी योग्य विकासक मिळेनासे झाल्याचे चित्र आहे. 
--------------------------------
प्रतिक्षा नगर, संक्रमण शिबिरे आदी परिसर म्हाडाच्या नियंत्रणाखाली, कोकरी आगार परिसरातील २९ इमारती एमएमआरडीएच्या तर केंद्रीय कर्मचारी वसाहत अशा महापालिकेच्या नियंत्रणाबाहेरील क्षेत्रातील दैनंदिन नागरी सुविधांचे प्रश्न गुंतागुंतीचे बनले आहेत. स्थानिक नेत्यांना येथील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. स्थानिक आमदार आणि खासदारास विविध योजनांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोर द्यावा लागतो. 
------------------
आधीच अरुंद असणा-या येथील अनेक रस्त्यांवर मोनो मार्गिका आणि मोनो स्थानकांचे काम सुरु आहे. गेली पाच-सहा वर्षे येथील नागरिक मोनोच्या या धीम्या प्रकल्पामुळे वैतागली आहेत. मोनो मार्गिकेच्या मधल्या जागेत होणा-या अवैध पार्किंगमुळे एका वेळी एकच वाहन जाईल इतकीच जागा शिल्लक राहते. त्यामुळे घाईच्या वेळात क्षुल्लक कारणांनी होणारी वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. 
-----------------------------
लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन किल्ला, सायन तलाव, गांधी मार्केट, माटुंगा पोलिस स्टेशन, सोमय्या रुग्णालय, म्युनिसिपल कामगार वसाहत, प्रतिक्षा नगर, शास्त्री नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, वडाळा आरटीओ, विजय नगर, चांदणी नगर, कोकरी आगार, सीजीएस वसाहत सेक्टर ७, नेहरुनगर, इंदिरा नगर, जीटीबी नगर, एलटीएमजी रुग्णालय वसाहत, सरदार नगर, पंजाबी कँप, काणे नगर, षण्मुखानंद हॉल, पाच उद्याने, हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, आझाद नगर, कोहिनूर मिल, शेख मिसरी दर्गा, काणे नगर साऊथ, बीपीटी कॉलनी, नाडकर्णी पार्क, संगम नगर, दोस्ती आर्केड, शिवशंकर नगर, गणेश नगर , कारबा मिठागर, शांती नगर, खेराप खाडी आदी भागाचा या वॉेर्डात समावेश होतो. 
--------------------------
१७२ खुला 
१७३ अनुसूचित जाती
१७४ खुला महिला
१७५ इतर मागासवर्ग
१७६ खुला
१७७ खुला महिला
१७८ खुला
१७९ खुला
१८० इतर मागासवर्ग (महिला)
१८१ इतर मागासवर्ग (महिला)
----------------------
प्रभाग क्रमांक १७२
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५१५३५
अनुसूचित जाती - २१९९
अनुसूचित जमाती - ७१४
प्रभागाची व्याप्ती- लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन किल्ला, सायन तलाव, गांधी मार्केट, माटुंगा पोलिस स्टेशन.
 
प्रभाग क्रमांक १७३
आरक्षण - अनुसूचित जाती
एकूण लोकसंख्या - ५५५५९
अनुसूचित जाती - ६३३९
अनुसूचित जमाती - ४६०
प्रभागाची व्याप्ती- सोमय्या रुग्णालय, म्युनिसिपल कामगार वसाहत, प्रतिक्षा नगर, शास्त्री नगर
 
प्रभाग क्रमांक १७४
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५०४९१
अनुसूचित जाती - १९००
अनुसूचित जमाती - ४१०
प्रभागाची व्याप्ती- वडाळा ट्रक टर्मिनस, वडाळा आरटीओ, विजय नगर, चांदणी नगर
 
प्रभाग क्रमांक १७५
आरक्षण - इतर मागासवर्ग 
एकूण लोकसंख्या - ५७०२३
अनुसूचित जाती - ३८९८
अनुसूचित जमाती - ७७७
प्रभागाची व्याप्ती- कोकरी आगार, सीजीएस वसाहत सेक्टर ७, नेहरुनगर. 
 
प्रभाग क्रमांक १७६
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५३००१
अनुसूचित जाती - ४७१५
अनुसूचित जमाती - ४३८
प्रभागाची व्याप्ती- इंदिरा नगर, जीटीबी नगर, एलटीएमजी रुग्णालय वसाहत, सरदार नगर.
 
प्रभाग क्रमांक १७७
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५०६५५
अनुसूचित जाती - ३०४०
अनुसूचित जमाती - ४२८
प्रभागाची व्याप्ती- पंजाबी कँप, काणे नगर, षण्मुखानंद हॉल, पाच उद्याने, हिंदू कॉलनी.
 
प्रभाग क्रमांक १७८
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५०८३५
अनुसूचित जाती - ३०१५
अनुसूचित जमाती - २४१
प्रभागाची व्याप्ती- पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, आझाद नगर, कोहिनूर मिल.
 
प्रभाग क्रमांक १७९
आरक्षण - ख़ुला
एकूण लोकसंख्या - ५७०१३
अनुसूचित जाती - ३३०२
अनुसूचित जमाती - ८१०
प्रभागाची व्याप्ती- शेख मिसरी दर्गा, काणे नगर साऊथ, बीपीटी कॉलनी, नाडकर्णी पार्क.
 
प्रभाग क्रमांक १८०
आरक्षण - इतर मागासवर्ग महिला
एकूण लोकसंख्या - ५१८०८
अनुसूचित जाती - २६९५
अनुसूचित जमाती - ६९९
प्रभागाची व्याप्ती- संगम नगर, दोस्ती आर्केड, शिवशंकर नगर, गणेश नगर 
 
प्रभाग क्रमांक १८१
आरक्षण - इतर मागासवर्ग महिला
एकूण लोकसंख्या - ५०१०९
अनुसूचित जाती - ६५१८
अनुसूचित जमाती - ८७७
प्रभागाची व्याप्ती- कारबा मिठागर, शांती नगर, खेराप खाडी 
 
२०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार
 
वॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते
१६५प्रणिता वाघधरे, शिवसेना ८७४५,विद्या चाळके, मनसे ३६४२
१६६ललिता यादव,काँग्रेस८२६८संजीवनी नाटे, शिवसेना ६७६५
१६७राजश्री शिरवडकर,बसपा ८२४०पुष्पा कोळी,काँग्रेस ७१०७
१६८तमिल सेल्वन, भाजपा ६९३६मनिकटला सिंग,काँग्रेस ५०७०
१६९श्रद्धा जाधव, शिवसेना ५७४२ रवी राजा,काँग्रेस ५४३७
१७०तृष्णा विश्वासराव, शिवसेना ७६९८ खातिजा शेख, काँग्रेस ७३८०
१७१महंत चौबे,भाजपा२३०३नियाज वनू, राष्ट्रवादी २१२३
१७२ मनोज संसारे, अपक्ष ९९७२अनिल कदम, काँग्रेस ९२२३
१७३ अलका डोके, शिवसेना ७०६०ज्योती म्हात्रे, राष्ट्रवादी ५०१९ 
१७४ नयना शेठ, काँग्रेस ६२६२रश्मी मिरचंदानी, भाजपा ५७३४

Web Title: F North Ward: Contest in BJP Congress for North Indian votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.