एफ साऊथ वॉर्ड - योग्य उमेदवार ठरणार कळीचा मुद्दा

By Admin | Published: December 29, 2016 12:36 PM2016-12-29T12:36:56+5:302016-12-29T14:52:09+5:30

लालबाग, परळ, शिवडी, नायगाव आदी मराठमोळ्या भागाचा समावेश असणा-या एफ साउथ वॉर्ड ओळखला जातो तो आपल्या मराठी अस्मितेच्या राजकारणासाठी

F South Ward - The issue of bribe to be the right candidate | एफ साऊथ वॉर्ड - योग्य उमेदवार ठरणार कळीचा मुद्दा

एफ साऊथ वॉर्ड - योग्य उमेदवार ठरणार कळीचा मुद्दा

googlenewsNext
>- गौरीशंकर घाळे
मुंबई : लालबाग, परळ, शिवडी, नायगाव आदी मराठमोळ्या भागाचा समावेश असणा-या एफ साउथ वॉर्ड ओळखला जातो तो आपल्या मराठी अस्मितेच्या राजकारणासाठी. या वॉर्डाने कायमच शिवसेनेला आपली पसंती दिली असली तरी गेल्या निवडणुकीत मनसेने चांगलीच लढत दिली होती. यंदा मात्र शिवसेना विरुद्ध मनसे अशीच लढत या भागात पाहायला मिळण्याची शक्यता असून योग्य उमेदवार हाच सर्व पक्षांसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. 
२०१२ च्या महापालिका निवडणुकीत येथील ७ प्रभागापैकी ५ ठिकाणी शिवसेना उमेदवारांनी बाजी मारली होती. तर दोन ठिकाणी काँग्रेस उमेदवार यशस्वी ठरले होते. गेल्यावेळी लाट असूनही मनसेचा एकही उमेदवार विजयी होवू शकला नाही. विजयाने मनसेच्या इंजिनाला हुलकावणी दिली असली तरी चार जागांवर मनसेचा उमेदवारांनी दुस-या क्रमांकाची मते घेतली. तर उर्वरित तीन जागांवर मनसे उमेदवार तिस-या, चौथ्या स्थानावर होते. यंदा मनसेची अशी लाट नाही. शिवाय मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांनी म्हणावा तसा जनसंपर्क ठेवला नसल्याने शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत यंदा येथे पाहायला मिळणार आहे. मनसेची लाट ओसरली असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणे शिवसेनेसमोर यंदा तीव्र मतविभाजनाचा धोका नसणार आहे. तर, काँग्रेसला आपल्या दोन जागा राखताना एमआयएमचा फटका बसणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. 
मतदारसंघ पुर्नरचना, महिला व अन्य आरक्षणामुळे मात्र वॉर्डातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रत्येक प्रभागात सर्व पक्षांंध्ये इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. शिवाय मातब्बर विद्यमान नगरसेवकांनी पर्यायी मतदारसंघात चाचपणी सुरु केल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडण्यासाठी शिवसेना, काँग्रेससह सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार आहे. 
-------------------------------------
गौतम नगर, शिंदेवाडी, नायगाव, राजारामवाडी, बीडीडी चाळ, स्प्रिंग मिल कंम्पाऊंड, पोलिस कॉलनी, पोलिस कॉलनी बीपीटी कॉलनी, म्हाडा कॉलनी, बीपीसीएल वसाहत, परमानंदवाडी, शिवाजीनगर पश्चिम, रेल्वे चाळ, कृष्णनगर, विघ्नहर्ता सोसायटी, सुखकर्ता सोसायटी, केईएम रुग्णालय, मिंट कॉलनी, आंबेवाडी, लालबाग मार्केट, मेघवाडी, गणेशगल्ली, अभ्युदयनगर, काळाचौकी, जिजामाता नगर, शिवडी, भीमनगर, शिवडी किल्ला आणि क्रिकबंदर आदी परिसराचा या वॉर्डात समावेश होतो.
-----------------------
एफ साउथ वॉर्डात बीडीडी, नायगाव आदी चाळींच्या पुर्नविकासाचा मुद्दा महत्वाचा आहे. पुर्नविकासाबाबत राज्य सरकारने अलीकडेच घोषणा केली असल्याने शिवसेना आणि भाजपाला त्याचा काही प्रमाणात लाभ मिळेल. पुर्नविकासाचे काम प्रत्यक्ष सुरु होईपर्यंत मात्र स्थानिक आमदारांच्या निधीतूनच येथील दुरुस्ती, डागडुजीचे काम केले जाते. 
--------------------------
काही ठिकाणी जुन्या चाळी, इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुर्नविकासाच्या मुद्दयावर बिल्डरांच्या सोयीची भूमिका घेणा-या नेत्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांनी आपल्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने प्रकल्प रखडल्याचेही उदाहरणे आहेत.
--------------------------
प्रभाग क्रमांक २००
आरक्षण - अनुसूचित जाती महिला
एकूण लोकसंख्या - ५१४०९
अनुसूचित जाती - ७६२६
अनुसूचित जमाती - २२९
प्रभागाची व्याप्ती- शिंदेवाडी, गौतम नगर, नायगाव, बीडीडी चाळ, राजाराम वाडी.
 
प्रभाग क्रमांक २०१
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५२८०८
अनुसूचित जाती - ४८४१
अनुसूचित जमाती - ६२२
प्रभागाची व्याप्ती- स्प्रिंग मिल कंपाऊंड, पोलिस कॉलनी, बीपीटी कॉलनी, म्हाडा कॉलनी. 
 
प्रभाग क्रमांक २०२
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ४९५३१
अनुसूचित जाती - ३२५४
अनुसूचित जमाती - २४२
प्रभागाची व्याप्ती- परमानंद वाडी, शिवाजी नगर, शिवडी पश्चिम.
 
प्रभाग क्रमांक २०३
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५२८०६
अनुसूचित जाती - ३०७१
अनुसूचित जमाती - २८१
प्रभागाची व्याप्ती- रेल्वे चाळ, कृष्ण नगर , विघ्नहर्ता -सुखकर्ता सोसायटी. 
 
प्रभाग क्रमांक २०४
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५१३६९
अनुसूचित जाती - २३०४
अनुसूचित जमाती - २२०
प्रभागाची व्याप्ती- केईएम रुग्णालय, मिंट कॉलनी, आंबेवाडी, लालबाग मार्केट, मेघवाडी, गणेशगल्ली. 
 
प्रभाग क्रमांक २०५ 
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५४६५८
अनुसूचित जाती - २३८५
अनुसूचित जमाती - ५१५
प्रभागाची व्याप्ती- अभ्युदय नगर, काळाचौकी, जीजामाता नगर, दाभोळकर अड्डा.
 
प्रभाग क्रमांक २०६ 
आरक्षण - इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या - ४७८१५
अनुसूचित जाती - २३१८
अनुसूचित जमाती - ४००
प्रभागाची व्याप्ती- शिवडी, भिमनगर, शिवडी किल्ला, क्रि क बंदर.
 
२०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार
 
वॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते
१९५सुनिल मोरे, काँग्रेस९२४२विलास राणे, शिवसेना६७१४
१९६पल्लवी मुणगेकर,काँग्रेस६१९३नेहा खान, समाजवादी ५८५४
१९७नंदकिशोर विचारे,शिवसेना ७८५७ सोनू घाडीगावकर,मनसे७२९४
१९८संजय आंबोले, शिवसेना १५१५२सुनिल बांबूलकर, मनसे ७४४२
१९९हेमांगी चेंबूरकर, शिवसेना ११०९८ आंकाक्षा गावडे, मनसे १०२४०
२००वैभवी चव्हाण, शिवसेना ११५१७लतिका गुरव, मनसे ९६८०
२०१श्वेता राणे,शिवसेना ७००४निशा मुराई, कॉंग्रस ६८१६
 
लास्ट अ‍ॅडीशन
पावसाळ्यात तुंबणारे पाणी मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. विशेषत: हिंदमाता आणि तुंबणा-या पाण्याचे समीकरणच जुळून गेले आहे. हिंदमाता, शिवडी, काळा चौकी, जिजामाता उद्यानाजवळ पाणी तुंबल्याने वाहतुकीचा बोजवारा उडायचा. पालिकेने पंम्पिग स्टेशन बांधल्यानंतर या पाण्याचा वेळीच निचरा होत आहे. त्यामुळे हिंदमाता आदी परिसरातील पाणी तुंबण्याच्या घटना जवळपास थांबल्या आहेत. अनेक वर्षे पावसाळ्यात तुंबणा-या हिंदमाताने यंदा मुंबईकरांना दिलासा दिला.

Web Title: F South Ward - The issue of bribe to be the right candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.