बोरीवली स्टेशनाचा चेहरा मोहराच बदलला MAD नं
By admin | Published: January 28, 2016 09:17 AM2016-01-28T09:17:40+5:302016-01-28T12:24:12+5:30
माटुंगा स्टेशनमध्ये सामाजिक संदेश देणा-या चित्रांच्या माध्यमातून सुंदरीकरणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर Making A Difference या मॅड संस्थेने आता बोरीवली स्टेशनाचा कायापालट केला
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - माटुंगा स्टेशनमध्ये सामाजिक संदेश देणा-या चित्रांच्या माध्यमातून सुंदरीकरणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर Making A Difference या मॅड संस्थेने आता बोरीवली स्टेशनाचा कायापालट केला आहे. तब्बल ५०० स्वयंसेवकांनी या समाजकार्यात भाग घेतला आणि लाखो लोकांची वर्दळ असल्यामुळे बकाल होणा-या रेल्वे स्टेशनाला सुंदर करण्याचा विडा उचलला.
विशेष म्हणजे आर्किटेक्ट, इंजिनीअर्स, अर्थतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्तिंनी केवळ समाजामध्ये सुंदरता निर्माण व्हावी, प्रत्येकानं हे शहर आपलं आहे असं समजून वागावं, स्वच्छ - सुंदर शहरासाठी केवळ सरकारला वेठीस न धरता प्रत्यक्ष योगदान द्यावं अशा उद्देशाने या लोकांनी हा उपक्रम तडीस नेला आणि बोरीवली स्थानकाला सुंदर बनवलं.
या संस्थेचे प्रमुख आहेत हरेश शाह. इतर स्थानकांना पण असंच सुंदर करण्याचा त्यांचा विचार आहे. केवळ १० ते १५ दिवसांमध्ये MAD ने बोरीवली स्टेशनला सुंदर केलं आहे. ( सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)
आपला चेहराही MAD असाच सुंदर करेल अशी आशा मुंबईतली अन्य स्थानके करत असतिल असं म्हणायला हरकत नाही.
संजय गांधी नॅशनल पार्कच्या संदर्भानं वन्य जीवांच्या चित्रांना इथं स्थान मिळालंय.
संगीत हेच जीवन आहे असं सांगणारी चित्रेही इथं आहेत