पाण्यासाठी मृत्यूशी सामना !
By admin | Published: May 24, 2015 01:41 AM2015-05-24T01:41:07+5:302015-05-24T01:41:07+5:30
बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत व ओढे-नाले लुप्त होत असल्याने पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत भटकत आहेत.
सुषमा नेहरकर-शिंदे ल्ल पुणे
बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत व ओढे-नाले लुप्त होत असल्याने पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत भटकत आहेत. पाण्यासाठीची वणवण बिबट्यांच्या जीवावर बेतत आहे. गत सहा महिन्यांत जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत ९ बिबट्यांचा मृत्यू झाला. यात सहा बिबट्यांचा मृत्यू विहिरीत पडून झाल्याची माहिती वन विभागाच्या अहवालावरून पुढे आली आहे.
पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत. बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वनतळी बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केलेली आहे, मात्र वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही अनेक ठिकाणी अशी वनतळी विकसित झालेली नाहीत. यामुळे गेल्या काही वर्षांत बिबट्यांचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.
वन विभागाच्या अहवालानुसार जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत मृत्युमुखी पडलेल्या ९ पैकी पाच बिबट्यांचा मृत्यू विहिरीत पडून, एका बिबट्याचा नाल्यात पडून तर एकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. बबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. बिबट्यांनी सहा महिन्यांत ११ जणांवर हल्ले केले असून, यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात ३३९ पशुधनावर हल्ले केल्याचे आकडेवारीवरून दिसते.
सहा महिन्यांतील बिबट्यांचे मृत्यू
च्माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात ‘करिष्मा’ मादीचा (वय-१७) आजारपणाने मृत्यू
च्बिबट्या निवारा केंद्रात ‘भीमा’चा (वय-१८) वार्धक्याने मृत्यू
च्आंदळगाव, कोठापूर व फाकट (शिरूर) तसेच घोडेगाव व गुळंचवाडी (जुन्नर) येथे विहिरीत पडून बिबट्यांचा मृत्यू
च्ओतूर येथे नाल्यात पडून नर बिबट्याचा मृत्यू
च्नारायणगांव येथे वाहनाच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू