फेसबुकवरील मैत्री पडली दोन कोटीला
By admin | Published: May 9, 2017 01:15 PM2017-05-09T13:15:48+5:302017-05-09T13:58:37+5:30
फेसबुकचा वापर मित्र जोडण्यासाठी होत असला तरी अनोळखी मित्र घातक ठरत असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - फेसबुकचा वापर मित्र जोडण्यासाठी होत असला तरी अनोळखी मित्र घातक ठरत असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. मुंबईतील अंधेरीत राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला अशाच एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे महागात पडले आहे. या व्यापाऱ्याला फेसबुकवरुन एक कोटी 80 लाख रुपयाला चुना लावला आहे.
1.8 कोटी रुपयांचा चूना लागलेला व्यापारी काका जुलैमध्ये विक्टोरिया केटरशी फेसबुकच्याद्वारे संपर्कात आला होता. त्यांनतर दोघामध्ये वारंवार बोलणं होतं होते. आरोपी केटर स्वत:ला ब्रिटनमधील गुड हेल्थ फार्मासूटिकल लिमिटेड या फर्मच्या डायरक्टेरची पीए असल्याचे सांगत होती. तीने काकांशी बोलताना असे सांगितले की, कंपनी भारतातून अक्रोडाचं बियाणे खरेदी करते. पण काही कारणामुळे डिलरने बियाणाचा पुरवठा बंद केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने काकाला पैशांचे लालच दिले. ती म्हणाली की, 400 ग्राम अक्रोडाची भारतात किंमत 2, 750 रुपये आहे. हेच आक्रोड आमची कंपनी 6500 रुपयाला खरेदी करते. विक्टोरिया केटरने मोठ्या नफ्याचे लालच देऊन आक्रोडचे बियाणे पाठवण्यास सांगितले. तिने काकाला ब्रिटनमधील अनेक नामवंत फर्म अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांकही दिले होते. यादरम्यान तिने काकाला संदीप सुवर्ण या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला. संदिप हा आक्रोडाच्या बियाणाचा सप्लायर असल्याचे सांगितले. काकाने कोणताही विचार न करता त्याला आक्रोडच्या बियाणांची ऑर्डर दिली. तसेच 1.8 कोटी रुपयेही त्याला पाठवले. पण काकाने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे संदीपने आक्रोडाच्या बियाणाची सप्लाई केली नाही. थोड्या दिवसानंतर काकाला जाणीव झाली का आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. फसवणूक आणि आयटीआय कलमानुसार सायबर क्राईम पोलीसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये नायजेरियन लोकांचा समावेश आहे. आरोपी सोशल मीडियाद्वारे लोकांची फसवणूक करत असल्याचे पोलीसांनी सांगितले.