एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा मार्ग सुकर

By admin | Published: February 25, 2015 02:13 AM2015-02-25T02:13:00+5:302015-02-25T02:13:00+5:30

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या

To facilitate transfer of SRPF jaws | एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा मार्ग सुकर

एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा मार्ग सुकर

Next

यवतमाळ : राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या एका आदेशाने सुकर झाला आहे. सुमारे दीड वर्षापासून या बदल्या रखडल्या होत्या. ९ मार्चपूर्वी या बदल्या करण्याची लेखी हमी पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.
एसआरपीएफमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या जवानांची जिल्हा पोलीस दलात बदली केली जाते. त्यासाठी तेथील पोलीस भरतीच्या दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या जातात. परंतु २०१४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे कारण पुढे करून जवानांच्या बदल्या थांबविल्या गेल्या होत्या. या विरोधात पुणे येथील एसआरपीएफचे सहायक फौजदार नितीन पराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. नरेश पाटील व न्या. ए.एस. गडकरी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. एसआरपीएफ जवानांच्या रखडलेल्या बदल्या दोन आठवड्यांत करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. एसआरपीएफच्या अपर महासंचालकांतर्फे पोलीस उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्वत: न्यायालयात उपस्थित राहून ‘दोन आठवड्यांत बदल्या करून यादी न्यायालयापुढे ठेवू’ अशी लेखी हमी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: To facilitate transfer of SRPF jaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.