वीज ग्राहकांना १९१२ क्रमांकावर तक्रारीची सुविधा
By Admin | Published: July 8, 2016 02:35 AM2016-07-08T02:35:29+5:302016-07-08T02:35:29+5:30
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्य सरकारच्या वीज कंपन्यांतील वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी १९१२ हा नवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्य सरकारच्या वीज कंपन्यांतील वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी १९१२ हा नवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
वीज सेवेबाबत तक्रारीसाठी संबंधित ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक डायल केल्यास मराठीतून माहितीसाठी १ आणि नंतर ९ अंक दाबला की ग्राहकाचा कॉल सेवा केंद्रातील प्रतिनिधीशी थेट कनेक्ट होईल. त्यानंतर ग्राहकाने आपला ग्राहक क्रमांक तसेच मोबाइल क्रमांक रजिस्टर केला नसेल तर ग्राहक क्रमांक व मोबाइल क्रमांक ग्राहक प्रतिनिधीला सांगावा लागेल.
या तक्रारीची नोंद घेऊन ती सोडविल्यानंतर त्याची माहितीही संबंधित ग्राहकाला देण्यात
येईल.
दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक तसेच ई-मेल आयडीची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)