विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

By admin | Published: July 13, 2015 01:21 AM2015-07-13T01:21:39+5:302015-07-13T01:21:39+5:30

१५ जुलैपर्यंंत पावसाची प्रतीक्षा

Fadnage to be done in cotton in Vidarbha! | विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

Next

अकोला: जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फेरपेरणीचे आपत्कालीन नियोजन केले आहे. १५ जुलैपर्यंंत पाऊस आलाच नाही तर मात्र कपाशी पेरणीचेदेखील फेरनियोजन करावे लागणार आहे.
खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची शेतकर्‍यांनी जूनमध्ये पेरणी केली; परंतु पावसाने दडी मारली आहे. यामुळे कृषी विद्यापीठाने जुलै महिन्याचे पिकांचे नियोजन केले आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक होते. तथापि पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सलग पेरणी आता शक्य नसल्याने एवढय़ात पाऊस आला तरच आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल. त्यासाठी मात्र २0 टक्के बियाणे अधिक वापरावे लागणार आहे. कापूस पेरणी करण्यासाठी खोल व मध्यम खोल, काळी जमीन कपाशीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी लवकर परिपक्व होणारे अमेरिकन अथवा देशी कापूस यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून आंतरभाव करावा. तसेच संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर वरील आंतरपिके घ्यावीत. तसेच काही क्षेत्रावर कापूस: ज्वारी: तूर: ज्वारी (६:१:१:१) किंवा (३:१:१) त्रिस्तरीय कापूस अधिक तूर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. सलग सोयाबीन पिकासाठी शिफारशीप्रमाणे लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी सोयाबीन अधिक तूर आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकर्‍यांना फायदा होतो. सलग ज्वारी पिकासाठी शिफारशीसह ज्वारी अधिक तूर (३:३) आंतरपीक पद्धतीमुळे फायदा होतो. २0 ते २५ टक्के बियाणे अधिक वापरावे. तूर शिफारशीप्रमाणे लागवड करावी, कापूस अधिक तूर (६:२) किंवा सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक घ्यावे. मूग, उडीद पिके ही उथळ काळ्य़ा जमिनीत लावावे, मका शिफारशीप्रमाणे लागवड करावा.

Web Title: Fadnage to be done in cotton in Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.