फडणवीस यांना मारहाण

By admin | Published: June 5, 2014 01:18 AM2014-06-05T01:18:10+5:302014-06-05T10:10:08+5:30

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या कार्यकत्र्यानी बुधवारी अंत्यसंस्कारासाठी आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मारहाण केली़

Fadnavis beat up | फडणवीस यांना मारहाण

फडणवीस यांना मारहाण

Next
>मुख्यमंत्र्यांच्या कारवर दगडफेक : मुंडेंच्या मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी
परळी: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या कार्यकत्र्यानी बुधवारी अंत्यसंस्कारासाठी आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मारहाण केली़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारवर तुफान दगडफेक करण्यात आली़ याशिवाय केंद्रातील व राज्यातील विविध नेत्यांची वाहने आडवून मुंडेंच्या मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली़
मुंडे यांचे मंगळवारी सकाळी दिल्ली येथे अपघातात निधन झाल़े त्यांचे पार्थिव बुधवारी अंत्यसंस्कारासाठी परळीत आणल़े यावेळी देशपताळीवरील व राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली़ अंत्यसंस्कार आटोपून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या बुलेटप्रूफ कारमधून बाहेर पडत होत़े इतक्यात संतप्त झालेल्या जमावाने मुख्यमंत्री चव्हाण यांची कार अडविली़ काही कार्यकत्र्यानी त्यांच्या कारवर दगडफेक सुरु केली़ त्यामुळे समोरील काचेला तडे गेल़े यावेळी पोलिसांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना सुरक्षितरित्या दुस:या वाहनातून तेथून बाहेर काढून हेलिपॅडर्पयत सोडल़े मुख्यमंत्र्यांच्या कारचे चालक भास्कर जायभाये यांनी परळी ग्रामीण ठाण्यात तक्रार अर्ज दिला़ गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीनंतर विविध मंत्री बाहेर पडत होत़े मात्र, जमावाने त्या सर्वाना आडवून गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली़ भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राज्याचे गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांची वाहने आडवून त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला़ यावेळी राजनाथसिंह यांच्या स्वीय सहायकास धक्काबुक्की झाली़
पोलिसांसह कार्यकर्ते जखमी
पोलिस व कार्यकर्ते समोरासमोर भिडल़े पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार सुरु केला़ यावेळी पाच पोलिस कर्मचारी जखमी झाल़े विशाल माने, संदीप धानोरकर, मच्छिंद्र कपटे, वशिष्ठ कांगणो, ए़ बी़ हंबर्डे यांचा समावेश आह़े त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ यावेळी अनेक कार्यकर्ते जखमी झाल़े पळापळीनंतर चेंगराचेंगरीही झाली़ पोलिसांच्या लाठीमारानंतर कार्यकर्ते पांगल़े(वार्ताहर)
 
फडणवीसांना केले ‘टार्गेट’!
मुंडे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर कार्यकत्र्यानी घोषणाबाजी करुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली़ यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकत्र्याना संयम राखण्याचे आवाहन केल़े अंत्यदर्शन व त्यानंतर अंत्यसंस्कार होईर्पयत फडणवीस यांनी कार्यकत्र्याना सूचना देण्याबरोबरच धीर दिला़ अंत्यविधीनंतर फडणवीस आपल्या जीपमधून निघाल़े अंत्यसंस्कारस्थळाच्या आवारातच त्यांची जीप आडवून कार्यकत्र्यानी दगडफेक करण्यास सुरुवात केली़ फडणविस यांनी कार्यकत्र्याना रोखण्याचा प्रयत्न केला तेंव्हा संतप्त जमावाने त्यांना रिंगण करुन मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जमावाच्या तावडीतून सोडविल़े पोलिसांनीच त्यांना आपल्या गाडीतून बाहेर नेल़े मात्र फडणवीस यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. बुधवारी सकाळी फडणवीस यांनी ट्विट करुन मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

Web Title: Fadnavis beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.