फडणवीस मंत्रिमंडळानं घेतले 4 मोठे निर्णय, 2022पर्यंत गायरान जमिनींचा विकास होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:23 PM2018-11-13T14:23:51+5:302018-11-13T14:42:41+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं चार मोठे निर्णय घेतले आहेत.

The Fadnavis cabinet has taken 4 big decisions,by 2022, the development of Gairan lands will be done by 2022 | फडणवीस मंत्रिमंडळानं घेतले 4 मोठे निर्णय, 2022पर्यंत गायरान जमिनींचा विकास होणार

फडणवीस मंत्रिमंडळानं घेतले 4 मोठे निर्णय, 2022पर्यंत गायरान जमिनींचा विकास होणार

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं चार मोठे निर्णय घेतले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीला भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अवनीच्या हत्येसंदर्भात जाब विचारला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत भाजपा आणि सेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली. परंतु बैठकीत असं काहीही झालं नसल्याचा खुलासा मुनगंटीवारांनी केला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांसाठी घरे-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

फडणवीस मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

  • सर्वांसाठी घरे-2022 या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय
  • काम करण्यास सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवासमाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्याचा निर्णय
  • मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा निर्णय
  • पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी (ता. वेल्हे) देण्यात आलेल्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा

Web Title: The Fadnavis cabinet has taken 4 big decisions,by 2022, the development of Gairan lands will be done by 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.