‘दिल्लीत जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय वैयक्तिक असेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:32 PM2023-10-10T15:32:01+5:302023-10-10T15:33:16+5:30

दोन्ही निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. 

Fadnavis decision to go to Delhi will be personal | ‘दिल्लीत जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय वैयक्तिक असेल’

‘दिल्लीत जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय वैयक्तिक असेल’

ठाणे : आजच्या घडीला दिल्लीत भाजपकडे खूप मोठे नेते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार किंवा कसे हा त्यांचा वैयक्तिक किंवा त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय असेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित लढू. दोन्ही निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. 

- एक टीम म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणे आवश्यक आहे. तसेच विधानसभेची लढाई आम्हीच जिंकणार. लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागांवर महायुतीचा भर असेल. त्यानंतर विधानसभा निवडणुका मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तिघे एकत्र लढू, असेही त्यांनी सांगितले. 

 

Web Title: Fadnavis decision to go to Delhi will be personal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.