राज्यात फडणवीस राज!
By admin | Published: October 29, 2014 03:00 AM2014-10-29T03:00:43+5:302014-10-29T03:00:43+5:30
भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी एकमताने निवड करण्यात आली. यामुळे आता फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील.
Next
शुक्रवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी : भाजपा गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
मुंबई : भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी एकमताने निवड करण्यात आली. यामुळे आता फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील. गटनेत्याची निवड झाल्यानंतर भाजपा प्रणीत महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन सरकार स्थापन करण्याकरिता दावा केला.
भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक सायंकाळी विधान भवनात आयोजित केली होती. मात्र सकाळपासून भाजपाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते नरिमन पॉइंट येथील पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे या संपूर्ण परिसरात शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तुतारी, ढोलताशे यांच्या गजरात भाजपा नेते व आमदार कार्यालयात दाखल होत होते.
दुपारी सर्व आमदारांनी भगवे फेटे परिधान केल्यावर मिरवणुकीने ते विधान भवनाकडे निघाले. त्या वेळी ‘भाजपा ङिांदाबाद’, अशा घोषणा देत ही मिरवणूक निघाली. विधान भवनात दाखल झाल्यावर आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर एकनाथ खडसे व पांडुरंग फुंडकर दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा, राजीव प्रताप रुडी तसेच देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे हेही दाखल झाले. या वेळी राजनाथ सिंह यांनी भाजपाने अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणींच्या नेतृत्वाखाली केलेला संघर्ष व आता मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मिळालेले यश याचा आढावा घेतला.
विधिमंडळ पक्ष बैठकीत फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकनाथ खडसे यांनी मांडला व त्याला विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले.
खडसे रुसले, बंद खोलीत बसले!
मुंबई : भाजपामध्ये जेव्हा काही मिळण्याची वेळ येते तेव्हा बहुजन समाजातील नेत्यांवर अन्याय केला जातो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी मंगळवारी विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यार्पयत पोहोचवली. आता मंत्रिमंडळ निवडीत तरी बहुजनांचा सन्मान राखा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. यामुळे खडसे यांना महसूल किंवा तत्सम तोलामोलाचे खाते देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे बोलले जात आहे. - सविस्तर वृत्त/2
सत्ता स्थापनेकरिता राज्यपालांकडे दावा
गटनेतेपदी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवनावर जाऊन राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. त्यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले व त्या नात्याने सरकार स्थापनेसाठीचा दावा फडणवीस यांनी सादर केला.
राज्यपालांसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारला 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या वेळी भाजपा नेत्यांबरोबरच रिपाइंचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, स्वाशेसंचे सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.
शिवसेनेबरोबर चर्चा सुरू, सुखद निर्णयाचा नड्डांना विश्वास
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील फडणवीस यांच्या निवडीची घोषणा प्रभारी जे.पी. नड्डा यांनी केली. येत्या शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असून, या वेळी छोटय़ा आकाराचे मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल, असेही नड्डा यांनी जाहीर केले. शिवसेना हा भाजपाचा जुना मित्रपक्ष असून, त्यांनी आमच्यासोबत यावे याकरिता प्रयत्न सुरू आहेत. परंतु ही प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागणार आहे. शिवसेनेबरोबर चर्चा सुरू असून, सुखद निर्णय होईल ही अपेक्षाही नड्डा यांनी व्यक्त केली.
एक विलक्षण राजकीय योग!
च्196क् साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर नागपूर करारानुसार पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भाकडे मुख्यमंत्रिपद सुपुर्द केले. त्यानुसार 2क् नोव्हेंबर 1962 ते 24 डिसेंबर 1963 दरम्यान मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले.
च्पण त्यांच्या आकस्मिक निधनामुळे वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते सुमारे 12 वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर सुधाकरराव नाईक यांना संधी मिळाली. सुधाकरराव यांच्यानंतर 23 वर्षानी विदर्भाला फडणवीस यांच्या रूपाने चौथ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाले आहे.
च्क:हाडचे यशवंतराव चव्हाण यांनी कन्नमवार यांच्याकडे तर क:हाडचेच पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली, असाही विलक्षण राजकीय योग यानिमित्ताने जुळून आला!
शुक्रवारी वानखेडे स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या मंत्रिमंडळाचा दिमाखदार शपथविधी सोहळा आयोजित केला आहे.
लोकांना हे आपले सरकार वाटेल
राज्यात स्थापन होणारे भाजपा प्रणीत सरकार हे पारदर्शकता व विकास यांना प्राधान्य देणारे असेल त्यामुळे लोकांना हे आपले सरकार वाटेल. या क्षणाला आपल्याला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची प्रकर्षाने आठवण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गाने वाटचाल करणारे व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या चौकटीत कारभार करणारे आपले सरकार असेल. - देवेंद्र फडणवीस