फडणवीसांना मोठी जबाबदारी घ्यायची होती, म्हणून उप मुख्यमंत्री पद नको होते, मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 07:46 PM2022-06-30T19:46:10+5:302022-06-30T20:04:29+5:30
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन देवेंद्र फडणवीसांनी मोठा आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, मंत्री होणार नाही, अशी घोषणा करून आणखी एक मोठा धक्का दिला होता. मात्र, यानंतर काही वेळाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असे म्हटले. या साऱ्या घडामोडींमागे प्रदेशाध्यक्ष पद होते, हे समोर आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती. २०२४ च्या निवडणुकांची तयारी त्यांना करायची होती. पक्ष बांधणी करायची होती, त्यासाठी त्यांना वेळ हवा होता. यामुळे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंची घोषणा करताना आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे म्हटले होते.
प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2022
एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे. https://t.co/uBp4yBsU5D
परंतू आता फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा नड्डा यांनी फोन करून उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले आहे. ते फडणवीस यांनी मान्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. त्यामुळे आता राज्यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील.