विदर्भासाठी मतदान करणा-या फडणवीसांनी राजीनामा द्यावा - राज ठाकरे

By admin | Published: May 2, 2016 05:26 PM2016-05-02T17:26:57+5:302016-05-02T18:50:43+5:30

स्वतंत्र विदर्भासाठी देवेंद्र फडणवीसांनी मतदान केलं होतं. स्वतंत्र विदर्भासाठी मतदान करणा-या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर रहाण्याचा अधिकार नाही.

Fadnavis who have voted for Vidarbha should resign - Raj Thackeray | विदर्भासाठी मतदान करणा-या फडणवीसांनी राजीनामा द्यावा - राज ठाकरे

विदर्भासाठी मतदान करणा-या फडणवीसांनी राजीनामा द्यावा - राज ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - दरवर्षी 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्या लोकांना वंदन करण्यासाठी हुतात्मा चौकाला सजावट केली जाते, याचा माझ्याकडे पुरावा आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे. वेगळ्या विदर्भासाठी भाजप आणि संघानं श्रीहरी अणेंना पुढे केले आहेत. हुतात्मा स्मारकाच्या सजावटीवरून टोलवाटोलवी करणा-या भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रातील लोकांची माफी मागायला हवी, असा उपरोधिक सल्ला राज ठाकरेंनी सेना-भाजपवाल्यांना दिला आहे. स्वतंत्र विदर्भासाठी २०१३ साली मतदान घेतलं होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूनं मतदान केलं होतं. वेगळ्या विदर्भाची मागणी करणा-या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहण्याचा हक्क नाही, असं राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं आहे.  सतत खोटं बोलत राहणं हे भाजपचं कामंच आहे. शेतकऱ्यांना विहिरी दिल्याचं सांगतात, पण त्या केवळ कागदावरच आहेत, प्रत्यक्षात नाही. ३३ हजार विहिरी खोदल्याची माहिती राज्य सरकारकडेच उपलब्ध नाही. शिवसेना सत्तेत राहून ढोंगीपणा करत आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचं म्हणत शिवसेना-भाजपच्या युती सरकारवर राज ठाकरेंनी घणाघाती टीका केली.  
 
राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे:
 
- हुतात्मांचा अपमान करणा-या शिवसेनेनं माफी मागावी.
- श्रीहरी अणे भाजपनं पुढे केलेले मोहरे.
- फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली नाही.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा.
- फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहण्याचा हक्क आहे का ?
- स्वतंत्र विदर्भासाठी देवेंद्र फडणवीसांनी मतदान केलं होतं, यावर फडणवीसांनी उत्तर द्यावं.
- मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट करावी.
- हुतात्मा स्मारकावर रोषणाई न केल्याबाबत भाजपनं माफी मागावी.
- स्वतंत्र विदर्भ हा भाजप आणि संघाचा उद्योग.
- शिवसेनेला सत्तेत काहीच इज्जत नाही.
- शिवसेनेचा अखंड महाराष्ट्राशी काय संबंध?.
- पैशाची कामं अडली की शिवसेनेवाले आंदोलन करतात.
- सेना-भाजपवाले पालिकेत पैसे एकत्र खातात आणि एकमेकांवर आरोप करतात.
- शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडायची हिंमत नाही.
- राष्ट्रीय पक्षांना राज्यांबाबत आपुलकी नसते.
- शेतकरी आत्महत्या करत असताना सेना-भाजपवाले खोटं बोलतं आहेत.
- सत्तेची सगळी फळं भोगून विरोधकासारखं वागणारी शिवसेना ही ढोंगी.
- मेक इन इंडियामध्ये 6 कोटी मागितलेल्यांचा 600 कोटींचा एमओयू बनवला.
- मेक इन इंडियामध्ये 2 कोटी मागितलेल्यांचा 200 कोटींचा एमओयू बनवला.
- मेक इन इंडियामध्ये दीड लाख कोटींचे एमओयू असेच बनले आहेत.
- मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत मला उत्तर द्यावं.
- विहिरीच्या बांधकामांचे पैसे कंत्राटदारांच्या खिशात गेले.
- फडणवीसांनी जाहीर केलेल्या 33 हजार विहिरी फक्त कागदावरती.
- कायम खोटं बोलण्याचं भाजपचं काम.
- हुतात्मांचा अपमान करणा-या शिवसेनेनं माफी मागावी.
- श्रीहरी अणे भाजपनं पुढे केलेले मोहरे.

Web Title: Fadnavis who have voted for Vidarbha should resign - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.