फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:56 AM2019-12-03T11:56:36+5:302019-12-03T12:09:40+5:30

मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती. 

Fadnavis's 'That' statement questions the future of maha vikas aghadi | फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह !

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे एकापाठोपाठ एक डावपेच आणि भाजपकडून सत्तास्थापनेसाठी अखेपर्यंत करण्यात आलेले प्रयत्न यामुळे राज्याचे राजकारणात सुमारे एक महिना ढवळून निघाले होते. अखेर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने सरकार स्थापन करून या घडामोडींना ब्रेक लावला. मात्र हे सरकार औटघटकेच ठरेल, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. यावरून भाजप अजुनही प्रयत्नशील असल्याचे देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यावरून समोर आले आहे. 

सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्याच दिवशी विरोधीपक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सत्ताधारी नेत्यांकडून कौतुक झाले. तर काही नेत्यांनी फडणवीसांना टोलेही लगावले. 

मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती. 

दरम्यान विरोधीपक्षनेतेपदी विराजमान झालेल्या फडणवीसांनी सर्व नेत्यांकडून करण्यात आलेल्या अभिनंदनाला उत्तर देताना भुजबळांसह महाविकास आघाडीलाच आव्हान दिले आहे. मी पुन्हा येईन म्हणत भुजबळ तुमच्यासोबत येईल, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे भाजप अजुनही राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यास इच्छूक असून त्यासाठी प्रयत्नशील आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
फडणवीसांच्या या वक्तव्यावरून शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, फडणवीसांनी ऐनवेळी दिलेली ही प्रतिक्रिया असून त्यात काही तथ्य नाही. 
 

Web Title: Fadnavis's 'That' statement questions the future of maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.