शेतक-यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, दानवेंच्या विधानाने वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:27 AM2017-11-18T02:27:05+5:302017-11-18T13:49:54+5:30
शेवगाव तालुक्यात ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात शेतकºयांना पांगविण्यासाठी पोलीस त्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते़
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात शेतकºयांना पांगविण्यासाठी पोलीस त्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते़ मात्र, छातीतच गोळी मारणे चुकीचे आहे, या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानाने वाद उभा राहिला आहे.
गुरुवारी दानवे यांनी जखमी शेतकºयांची भेट घेतली़ त्यानंतर दानवे म्हणाले, गोळीबार हा काही छातीवर करायचा नसतो. पोलीस पायावर गोळी मारु शकत होते. पुढच्या काळात असा गोळीबार होणार नाही़ ऊसदर आंदोलन योग्य पद्धतीने न हाताळल्याने ही घटना घडल्याची कबुलीही त्यांनी दिली.
शेतक-यांवर गोळीबार करणे योग्य नाही़ गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले.
खोत यांनी जखमी शेतकºयांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली़ ते म्हणाले, अन्नदात्या शेतक-यांवर लाठीचार्ज करणे योग्य नाही़ गोळीबाराचे कुणीही समर्थन करणार नाही. त्यांनी पोलीस प्रशासनावर निशाणा साधला़
गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम असल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले.
दानवे यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन-
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दानवेनी शेतकºयांची माफी मागावी अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे व शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी केली.