पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यानेच बंदी आदेश : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 06:36 PM2019-08-12T18:36:43+5:302019-08-12T18:39:06+5:30
राज्यातील विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आणि निर्माण झालेल्या संतप्त परिस्थितीला सामोरे जाता येत नसल्यामुळेच बंदी आदेश लागू केला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केला.
कोल्हापूर : राज्यातील विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आणि निर्माण झालेल्या संतप्त परिस्थितीला सामोरे जाता येत नसल्यामुळेच बंदी आदेश लागू केला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केला.
जयंत पाटील यांनी आज शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, या सरकारला राज्यातील पूरस्थिती हाताळण्यात सपशेल अपयश आलेले आहे. मुख्यमंत्री पक्षाच्या जनादेश यात्रेत तर दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र््यांना महापूराचे गांभीर्य नसल्यामुळेच प्रशासनाला पूरग्रस्तांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास प्रशासन असमर्थ आहे. त्यामुळेच बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
उसाला एकरी १ लाख द्या
यावेळी जयंत पाटील यांनी पूरस्थितीत उभा उस आणि इतर पीकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगून उसाला एकरी एक लाख रुपये आणि इतर पीकांना एकरी ४0 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.