‘कॅशलेस’ प्रकरणात तोडगा काढण्यात अपयश
By Admin | Published: January 17, 2015 04:25 AM2015-01-17T04:25:01+5:302015-01-17T04:25:01+5:30
गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातील इस्पितळांनी आरोग्य विम्याची कॅशलेस योजना राबविण्यास नकार दिल्याने रुग्णांचे हाल
पुणे : गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातील इस्पितळांनी आरोग्य विम्याची कॅशलेस योजना राबविण्यास नकार दिल्याने रुग्णांचे हाल होत आहेत़ केंद्रिय वन व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी एक बैठक बोलावून या प्रकरणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही़
जावडेकर यांनी बोलाविलेल्या बैठकीला डॉ़ नितीन भगली, डॉ़ माया तुळपुळे, डॉ़ संदीप बुटाला, ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक, नॅशनल इंशुरन्सचे मुख्य विभागीय व्यवस्थापक के. केदारेश्वर, न्यू इंडिया अॅश्युरन्सचे उपमहाव्यवस्थापक जी. के. पाटील व व्ही़ डी गायकवाड, ओरिएंटल इंशुरन्सचे विभागीय व्यवस्थापक सुधीर गोयल आदि उपस्थित होते़
‘कॅशलेस’ समस्येची माहिती केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सांगून केंद्रातून एखादा अधिकारी समस्या मिटविण्यासाठी येईल, यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन जावडेकर यांनी हॉस्पिटल व डॉक्टरांच्या प्रतिनिधींना दिले़