पुरावे सादर करण्यात अपयश

By admin | Published: March 18, 2016 02:42 AM2016-03-18T02:42:44+5:302016-03-18T02:42:44+5:30

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला चांगलीच चपराक लगावली. २४० पानी निकालात उच्च न्यायालयाने हिमायत बेगवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी

Failure to submit evidence | पुरावे सादर करण्यात अपयश

पुरावे सादर करण्यात अपयश

Next

मुंबई: जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला चांगलीच चपराक लगावली. २४० पानी निकालात उच्च न्यायालयाने हिमायत बेगवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी वकील अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.
बेगला सर्व आरोपांतून मुक्त करताना केलेली कारणमिमांसा पुढीलप्रमाणे
१) हिमायत बेगच्या मालकीच्या ‘ग्लोबल इंटरनेट कॅफे’ मध्ये बॉम्ब बनवण्यात किंवा जमवण्यात आले, हे सिद्ध करण्यास सरकार अपयशी ठरले. कॅफेमधल्या कर्मचाऱ्यांना कॅफे सोडण्यास सांगितले याचा अर्थ आरोपीने बॉम्ब बनवला, असा होत नाही. बॉम्ब कोणी, का आणि बॉम्बस्फोट करणाऱ्यांपर्यंत तो कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात. या अनुत्तरित प्रश्नांमुळे हा स्फोट आरोपीनेच केला, असा निष्कर्ष काढू शकत नाही, ते पटवून देण्यास सरकारी वकील असमर्थ ठरले.
२)बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे. मात्र सरकारी वकिलांनी रेकॉर्डवर आणलेल्या पुराव्यांवरून त्याच्यावर ठेवलेले हे आरोपी सिद्ध होत नाहीत. पुराव्यांची साखळी पूर्ण नाही. त्यामुळे हे कृत्य आरोपीनेच केले, असे ठरवणे शक्य नाही. ‘कदाचित’ आणि ‘केलेच’ या दोन शब्दांमध्ये मोठा फरक आहे. ‘कदाचित’पासून ‘केले’या शब्दाचे अंतर कापण्यामध्ये सरकारी वकील अपयशी ठरले आहेत. ३)आरोपीच्या घरातून आरडीएक्स जप्त केले, हे सरकारी वकिलांनी सिद्ध केले आहे. मात्र आरडीएक्स सापडल्याने आरोपी पुढील कटात सहभागी होता आणि त्याने बॉम्ब ठेवणाऱ्याला (यासिन भटकळ) बॉम्ब दिल्याचे सिद्ध होते का? हे प्रश्न उपस्थित होतात. यासंदर्भात कोणतेच पुरावे नाहीत. सरकारी वकील परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारीत असताना ते आधारीत असलेल्या प्रत्येक परिस्थितीसाठी पुरावे मागणे योग्य नाही. केवळ शक्यतांच्या आधारे निष्कर्ष काढून आरोप सिद्ध केला जाऊ शकत नाही. जेवढा मोठा गुन्हा त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे पुरावे असले पाहिजेत. (प्रतिनिधी)

आरोपीने बाळगलेली स्फोटके आणि प्रत्यक्ष गुन्ह्यात वापरलेली स्फोटके यांचा संबंध असेल. मात्र हा संबंध योग्य त्या पुराव्यांद्वारे सिद्ध केला पाहिजे, जेणेकरून न्यायालय त्यावर विश्वास ठेवू शकेल. या केसमध्ये त्या पुराव्यांचाच अभाव आहे.
दाखवण्यात आलेल्या क्लीपिंग आणि दिनेश कदम या तपास अधिकाऱ्याच्या साक्षीमुळेच बॉम्ब ठेवणारा यासिन भटकळ असल्याचे ओळखता आले. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते. आरोपीला शेवटचे यासिन भटकळबरोबर जाताना पाहिले अािण तशी साक्ष एका रिक्षा ड्रायव्हरने दिली, सरकारी वकील याच साक्षीवर आधारित आहेत.
आरोपीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याची जिहादी वृत्ती, दोन सेल फोन, सिम मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे इत्यादी बाबींमुळे आरोपी बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचे सिद्ध होत नाही.

Web Title: Failure to submit evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.