श्रद्धेचा विपर्यास होतो आहे
By admin | Published: August 31, 2014 01:33 AM2014-08-31T01:33:30+5:302014-08-31T01:33:30+5:30
माजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणोशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही वर्षात या उत्सवाचा मूळ उद्देशच हरवला आहे,
Next
माजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणोशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही वर्षात या उत्सवाचा मूळ उद्देशच हरवला आहे, सर्वत्र केवळ श्रद्धेचा विपर्यास होतो आहे. गणोशोत्सवाचे आताचे चंगळवादी स्वरूप पाहून लोकमान्य टिळकांनी हा उत्सव बंद केला असता. काही मोजक्या गणोशोत्सव मंडळांमुळे श्रद्धेच्या आड उत्सव दडवून ठेवण्यात येत आहे. त्यामळे ‘उत्सव’च्या पलीकडे जाऊन सर्व ठिकाणी इव्हेंटचे रूप प्राप्त झाले आहे.
गणोशोत्सवाचे पावित्र्य राखून सार्वजनिक मंडळांनी आणि शासनाने पाऊल उचलून याबाबत जनजागृती करावी. गणोशोत्सवातून विधायक कार्य करण्याकडे मंडळांचा कल असायला पाहिजे. उत्सवात सहभागी होणा:या युवा पिढीची ऊर्जा समाजाच्या विकासासाठी वापरली गेली पाहिजे. धांगडधिंगा, पर्यावरणाचा :हास ही आपली संस्कृती नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. लोकमान्य टिळकांनी या युवा पिढीच्या ऊज्रेचा वापर समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला असता. त्यात ध्वनिप्रदूषणबाबत जनजागृती, पर्यावरण संवर्धनासाठी पाऊल उचलणो, कुपोषणविरोधी लढा, उत्सवाचा उद्देश टिकवून ठेवणो यांचा समावेश आहे.
भविष्यात गणोशोत्सवाचे स्वरूप अधिकच वेगळ्य़ा वळणावर जाऊ नये, याकरिता आताच्या युवा पिढीच्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे. त्यांना भारतीय संस्कृतीत साज:या होणा:या सण-उत्सवांबद्दल योग्य विचार रुजविले पाहिजेत. समाजात ही क्रांती घडविण्यासाठी युवा पिढीच्या हाती सोशल नेटवर्किगचे माध्यम आहे. या माध्यमाचा योग्यरीत्या वापर केला, तर युवा पिढीमध्ये प्रबोधन घडविणो सोपे होईल. समाजातील सर्व स्तरांनी प्रबोधनासाठी पुढाकार घेतला तर पुन्हा टिळकांचा गणोशोत्सव परतेल यात शंका नाही.
(शब्दांकन - स्नेहा मोरे)