शस्त्रक्रियेआधी इमानला घटवावे लागणार 100 किलो वजन
By admin | Published: February 13, 2017 09:07 AM2017-02-13T09:07:09+5:302017-02-13T09:36:18+5:30
वजन कमी करणारी शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी इजिप्तहून मुंबईत आलेली इमान अहमद आतुरतेने बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - वजन कमी करणारी शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी इजिप्तहून मुंबईत आलेली इमान अहमद आतुरतेने बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहे. 500 किलो वजनामुळे जगातील सर्वात लठ्ठ महिला ठरलेल्या इमानला या शस्त्रक्रियेनंतर सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्याची इच्छा आहे.
पण ही शस्त्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेआधी इमानला तिचे वजन 100 किलोने घटवावे लागणार आहे. डॉ. मुफाझल लकडावाला यांच्या देखरेखीखाली मागच्या दोन महिन्यात इमानने 30 किलो वजन कमी केले. चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात इमानवर शस्त्रक्रिया होणार असून, पुढचे 48 तास तिच्यासाठी महत्वाचे आहेत असे डॉ. लकडावाला यांनी सांगितले.
आणखी वाचा
शस्त्रक्रियेआधी डॉक्टर इमानच्या वेगवेगळया चाचण्या करणार आहेत. लठ्ठपणासाठी 91 प्रकारचे जीन्स कारणीभूत असतात. ही जीन्सची चाचणी सर्वात महत्वाची असणार आहे. या चाचणीतून लठ्ठपणाला नेमका कुठला घटक कारणीभूत आहे ते समजेल. जन्माच्यावेळी इमानचे वजन 5 किलो होते. वयाच्या 11 व्या वर्षापासून तिचे वजन वाढण्यास सुरुवात झाली.
विशेष वॉर्ड
शस्त्रक्रियेसाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष वॉर्ड बांधण्यात येत आहे. या वॉर्डमध्ये एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम असणार आहे.इमान अहमद यांचं वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामध्ये 7 फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील 7 फूट रुंद असणार आहे.