जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमध्ये तयार होते बनावट दारू
By Admin | Published: February 15, 2017 04:23 PM2017-02-15T16:23:00+5:302017-02-15T16:29:10+5:30
अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्येच बनावट दारू तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी वितरित केली जात असल्याची बाब समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 15 - शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या कंटीनमध्येच बनावट दारू तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी वितरित केली जात असल्याची बाब समोर आली आहे. नगर तालुक्यातील पांगरमल येथे राजकीय नेत्यांनी दिलेल्या पार्टीत हिच दारू वाटल्याने पाच जणांचा बळी गेला आहे.
पांगरमल येथे १२ फेब्रुवारी रोजी रात्री शिवसेनेच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत विषारी दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी शिवसेनेच्या दोन महिला उमेदवारांसह शिवसेनेचा पदाधिकारी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करत, भिमराज आव्हाड याला ताब्यात घेतले आहे.
आव्हाड याने जिल्हा रुग्णालयातील कँटीनमधून दारू खरेदी केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी या कँटीनवर छापा टाकून तपासणी केली असता बनावट दारू तयार करण्याचे रसायन व मोकळ्या बाटल्या पोलिसांनी आढळून आल्या आहेत. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत़