बनावट कॉल सेंटरवर छापा

By admin | Published: June 28, 2017 01:38 AM2017-06-28T01:38:38+5:302017-06-28T01:38:38+5:30

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालणाऱ्या बल्लारपुरातील

Fake Call Center Print | बनावट कॉल सेंटरवर छापा

बनावट कॉल सेंटरवर छापा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालणाऱ्या बल्लारपुरातील (जि. चंद्रपूर) बोगस कॉल सेंटरवर येथील गुन्हे शाखेच्या (सायबर सेल) पथकाने छापा घालून कॉल सेंटर चालविणाऱ्या बिहारमधील सूत्रधारांसह दोघांना अटक केली.
या प्रकरणी प्रवीणकुमार वाल्मिकीप्रसाद (४४) व अरुण विनोद त्रिवेदी (३२) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नागपूर, नाशिक, मुंबई, गोवा आणि अमदाबादसह देशातील हजारो तरुणांना गंडा घालण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या (आर्थिक शाखा, सायबर सेल) उपायुक्त श्वेता खेडकर यांनी पत्रकारांना मंगळवारी ही माहिती दिली.
सूत्रधार प्रवीणकुमार हा अभियंता (बीई) असून डिसेंबर २०१६ मध्ये हा गोरखधंदा सुरू केला. वृत्तपत्रातून दिलेल्या जाहिरातींद्वारे मोबाईल नंबरवर फोन येताच तो संबंधित बेरोजगारांना बेमालूमपणे फसवित होता. नागपुरातील नवीन शशिधरन या तरुणाची त्याने सुपरवायजरची नोकरी देतो म्हणून अशाच प्रकारे फसवणूक केली. नोकरी मिळाली नाही, पैसे गेले आणि फसवणूकही झाल्यामुळे नवीनने गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली. त्यामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

Web Title: Fake Call Center Print

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.