लष्कर भरतीवर बनावट कागदपत्रांचे सावट
By admin | Published: September 6, 2016 11:47 PM2016-09-06T23:47:39+5:302016-09-06T23:47:39+5:30
जिल्ह्यामधील असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांचा जागरूक नागरिकांमुळे पर्दाफाश झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 - सांगली जिल्ह्यातील एका अकादमीच्या माध्यमातून सर्व वैयक्तिक पुराव्याचे कागदपत्रे नाशिक जिल्ह्यामधील असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांचा जागरूक नागरिकांमुळे पर्दाफाश झाला आहे. यामुळे लष्कर भरती प्रक्रियेपुढे पुन्हा बनावट कागदपत्रांचे आव्हान कायम आहे.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (दि.९) होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या सैन्य भरतीसाठी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमधून सुमारे तीनशेहून अधिक तरुण नाशिकचे रहिवासी असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करुन सिडकोच्या संभाजी स्टेडीयमवर सोमवारी मध्यरात्रीपासून मुक्कामाला थांबले होते. जिल्ह्यातील तरुणांसाठी असलेल्या सैन्य भरतीमध्ये हे तरुण बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये होते. तीनशे तरुणांचा जत्था सोमवारपासून तर मंगळवारी रात्री आठ वाजेपासून मैदानावर तळ ठोकून होता.
यावेळी दिवसभर तरुणांनी मैदानावर सरावही केला. सायंकाळच्या सुमारास सिडको, अंबड, सातपूर भागातील काही तरुण सरावासाठी मैदानावर पोहचले त्यावेळी सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या पाहून ते चक्रावले. त्यांच्यापैकी काहींनी नगरसेवक शितल भामरे, संजय भामरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या तरुणांना याबाबत कुणकुण लागल्याने त्यांनी हळुहळु मैदान सोडण्यास सुरूवात केली. स्थानिक व बाहेरगावाहून आलेल्या तरुणांमध्ये वादविवाद घडण्याची शक्यता भामरे यांनी अंबड पोलिसांकडे भ्रमणध्वनीवरुन व्यक्त केली. त्यांनर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी स्टेड