इथेही फेकच! मनोरमा खेडकर महाडमध्ये 'इंदुबाई' नावाने लपलेल्या; पहाटे ३.३० वाजता छापा पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 02:54 PM2024-07-18T14:54:45+5:302024-07-18T14:55:55+5:30

Manorama Khedkar Arrest News: शेतकऱ्यांना, पोलिसांना आणि मेट्रो कर्मचाऱ्यांना दमदाटी करतानाचे, वाद घालतानाचे मनोरमा मॅडमचे व्हिडीओ अख्ख्या देशभरात प्रसिद्ध झाले होते. यामुळे त्यांनी पोलिसांपासून आणि सजग लोकांपासून लपण्यासाठी पार कोकणातील महाड गाठले.

Fake name here too! Hidden in Manorama Khedkar Mahad hotel as 'Indubai' name; The raid took place at 3.30 am by pune police ias Pooja khedkar fraud case | इथेही फेकच! मनोरमा खेडकर महाडमध्ये 'इंदुबाई' नावाने लपलेल्या; पहाटे ३.३० वाजता छापा पडला

इथेही फेकच! मनोरमा खेडकर महाडमध्ये 'इंदुबाई' नावाने लपलेल्या; पहाटे ३.३० वाजता छापा पडला

आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर व कुटुंबाला चमकोगिरी चांगलीच भारी पडली आहे. पोलीस, शेतकरी, पत्रकारांसह सर्वांना दमदाटी करत फिरणाऱ्या मनोरमा खेडकर यांना आज पुणे ग्रामीण पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून अटक केली आहे. या मनोरमा मॅडम पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पुणे सोडून तिकडे रायगडच्या महाडमध्ये लपून बसल्या होत्या. अखेर एवढी वर्षे रुबाब दाखवून सर्व कारवायांपासून वाचलेल्या मनोरमा मॅडम गजाआड झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांना, पोलिसांना आणि मेट्रो कर्मचाऱ्यांना दमदाटी करतानाचे, वाद घालतानाचे मनोरमा मॅडमचे व्हिडीओ अख्ख्या देशभरात प्रसिद्ध झाले होते. यामुळे त्यांनी पोलिसांपासून आणि सजग लोकांपासून लपण्यासाठी पार कोकणातील महाड गाठले. तिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही याची खात्री करून त्यांनी आपले नावही बदलले. हॉटेलमध्ये राहताना त्यांनी आपले नाव इंदूबाई असल्याचे सांगितले होते. आता यासाठी त्यांनी काय टेक्निक वापरली होती हे अद्याप बाहेर आलेले नाही.

आयएएस अर्धवटच राहण्याची शक्यता असलेल्या मुलीने युपीएससी परीक्षा अनेकदा देण्यासाठी पत्ता खोटा, रेशन कार्ड बनावट बनवून घेतल्याचे समोर आले होते. याद्वारे तिने अपंगत्वाचे प्रमाणपत्रही मिळविले होते. त्यापूर्वी उत्पन्न खोटे दाखवून नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटही मिळविले होते. हे सर्व करून तिने आयएएस पद बळकावल्याचे तिच्यावर आरोप होत असताना आता तिच्या आईने लपण्यासाठी खोटे नाव वापरल्याचे समोर आले आहे. याबाबतची बातमी आजतकने दिली आहे. 

हिरकणी भागातील या हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता पुणे पोलीस महिला कॉन्स्टेबलसोबत इथे आले होते. सकाळी साडे सहा वाजता निघून गेले. यावेळी मनोरमा यांनाही सोबत नेले. 

मनोरमा या सुरुवातीपासूनच पोलिसांना सहकार्य करत नव्हत्या. ऑडी कारची नोटीस द्यायला गेलेल्या पोलिसांनाही तिने हाकलले होते. पिस्तुलने दमदाटी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच मॅडमवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर मॅडम गायब झाल्या होत्या. पोलीस त्यांना बाणेरच्या घरी शोधूनही आले होते. मनोरमा मॅडमनी फोनही बंद ठेवला होता. मनोरमा आणि त्यांचा पती दिलीप चौकशीला सहकार्य करत नव्हते. यामुळे पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविल्याचे सांगण्यात आले. 

आता पर्यंत खेडकरांचे काय काय प्रकार समोर आले? 
खरेतर मुळशीपासून खेडकरांचे अहमदनगरला असलेले गाव हे सुमारे २५० किमी दूर आहे. पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पिस्तूलचे लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. हे लायसन रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटी, बनावट कागदपत्रे देऊन आयएएस नोकरी हडपलेली आहे. एसीबीने दिलीप खेडकर यांच्या करोडोंच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. यात आता आयकर विभागानेही लक्ष घातले असून ते देखील चौकशी करणार आहेत. पूजा खेडकर यांच्यावर प्रशिक्षण रद्दची कारवाई करण्यात आली आहे. या आठवडाभरात त्यांना मसुरीला हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. यातच मनोरमा यांचा पोलिसांशी मेट्रोच्या कामावरून हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेने मनोरमा यांच्या बाणेरच्या बंगल्याच्या समोरील फुटपाथवरील अतिक्रमण तोडले आहे. 

Web Title: Fake name here too! Hidden in Manorama Khedkar Mahad hotel as 'Indubai' name; The raid took place at 3.30 am by pune police ias Pooja khedkar fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.