बनावट नोटांची तस्करी पकडली
By admin | Published: September 22, 2014 12:59 AM2014-09-22T00:59:21+5:302014-09-22T00:59:21+5:30
असली ६० हजाराच्या नोटा घेऊन ६ लाखाच्या बनावट नोटा देणारे रॅकेट लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दुपारी ३ वाजता दोन
दोघांना अटक : रॅकेटचा पर्दाफाश
नागपूर : असली ६० हजाराच्या नोटा घेऊन ६ लाखाच्या बनावट नोटा देणारे रॅकेट लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दुपारी ३ वाजता दोन आरोपींना रंगेहाथ अटक करून त्यांच्याकडून १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांचे ४ बंडल जप्त करण्यात आले आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी २.४५ ते ३ च्या सुमारास आरोपी समीरन मंडल (२२) रा. माधोपूर, पश्चिम बंगाल आणि आरोपी अमजद खान हे प्लॅटफार्म क्रमांक २ च्या लोखंडी पुलाखाली सिमेंटच्या बाकड्यावर बसले होते. तेवढ्यात तेथून लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेचे मुन्ना चौबे जात होते. दोघेही एकमेकांना आपल्या बॅग दाखवत होते. चौबे यांना शंका आल्याने ते त्यांच्याजवळ केले. तेवढ्यात समीरन सोबत असलेला आरोपीला शंका आल्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला. चौबे यांनी चौकशी केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.