ती बनावट नंबरप्लेट माझी नाही! सत्गुरू कार डेकोरचे मोहन तलरेजा यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:19 AM2021-03-16T03:19:49+5:302021-03-16T06:55:20+5:30

आमच्या दुकानात तयार होणाऱ्या प्रत्येक कारच्या नंबरप्लेटवर आयएनडी असा उल्लेख असतो असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे बनवली नंबरप्लेट ॲक्रेलिकने बनवलेली असते.

That fake number plate is not mine! Satguru Car Decor's Mohan Talreja claims | ती बनावट नंबरप्लेट माझी नाही! सत्गुरू कार डेकोरचे मोहन तलरेजा यांचा दावा 

ती बनावट नंबरप्लेट माझी नाही! सत्गुरू कार डेकोरचे मोहन तलरेजा यांचा दावा 

Next

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीजवळ स्फोटके ठेवलेल्या मोटारीला एस्कॉर्ट करणाऱ्या इनोव्हा मोटारीची बनावट क्रमांकाची नंबरप्लेट ठाण्यातील सत्गुरू कार डेकोर या दुकानातून बनविण्यात आल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला असला तरी या दुकानाचे मालक मोहन तलरेजा यांनी हा दावा खोडून काढला आहे. (That fake number plate is not mine! Satguru Car Decor's Mohan Talreja claims)

आमच्या दुकानात तयार होणाऱ्या प्रत्येक कारच्या नंबरप्लेटवर आयएनडी असा उल्लेख असतो असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे बनवली नंबरप्लेट ॲक्रेलिकने बनवलेली असते. एनआयएने आम्ही तयार केलेली बनावट नंबरप्लेट म्हणून जी प्लेट दाखवली त्यात या दोन्ही गोष्टी नाहीत, असे तलरेजा म्हणाले. 

- मुंबई पोलिसांच्या इनोव्हाची नंबरप्लेट बदलून बनावट नंबरप्लेट लावून ही कार स्फोटके ठेवण्याच्यावेळी एस्कॉर्ट म्हणून आणल्याचा एनआयएचा दावा आहे. ही पाटी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथील विजय अपार्टमेंटमधील ‘सत्गुरु कार डेकोर’ येथून बनविण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रस्तुत प्रतिनिधीने या दुकानात जाऊन माहिती घेतली. या दुकानात बनविण्यात येणाऱ्या प्रत्येक पाटीवर ‘आयएनडी’ असा उल्लेख असतो. 

- प्रत्येक पाटी अ‍ॅक्रेलिकने बनविण्यात येते. जी कथित बनावट नंबरप्लेट एनआयए दाखवत होती त्यावर ‘आयएनडी’ असा उल्लेख नसल्याचा दावा दुकानाचे मालक नवीन तलरेजा यांचे वडील मोहन तलरेजा यांनी केला. कोणत्याही नवीन किंवा जुन्या वाहनाच्या क्रमांकाची पाटी (नंबरप्लेट) बनविण्यासाठी आरसी बुक आणि संबंधित वाहन दाखवावे लागते, त्यानंतरच आम्ही पाटी बनवून देतो, असा दावाही तलरेजा यांनी केला. 

- मोहन हे याच दुकानातील निम्म्या भागात टेलरिंगचे काम करतात.  दोन दिवसांपूर्वीच एटीएस आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दुकानातील सीसीटीव्हींची पडताळणीही केल्याचे त्यांनी सांगितले. आपण सचिन वाझे यांना ओळखत नसल्याचे मोहन म्हणाले. सध्या दुकानाचे मालक नवीन हे काही कामानिमित्त बाहेर गेले असून त्यांच्याकडेच अधिक तपशील मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

- दरम्यान, वाहनांच्या नंबरप्लेट बनवून देणाऱ्या अन्य काही दुकानांमध्ये एनआयए आणि एटीएसकडून चौकशी सुरू असल्याचे समजते. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी बुक) असल्याशिवाय कोणालाही कोणत्याही वाहनाची नंबरप्लेट बनवून देऊ नये, असा नियम आहे. मात्र वाझे हे पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्या दबावापोटी कुणी नंबरप्लेट तयार करून दिली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई तसेच भारतीय दंड विधानाच्या कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो, असे ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 

 

Web Title: That fake number plate is not mine! Satguru Car Decor's Mohan Talreja claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.