इराक संकटामुळे सेन्सेक्समध्ये घसरण

By admin | Published: June 26, 2014 12:37 AM2014-06-26T00:37:15+5:302014-06-26T00:37:15+5:30

जागतिक कल आणि जूनचे डेरिव्हेटिव करार संपण्याआधीच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक आठवडय़ाच्या उच्चंकी पातळीवरून बुधवारी 55 अंकांनी घसरला.

Falling in the Sensex due to the Iraq crisis | इराक संकटामुळे सेन्सेक्समध्ये घसरण

इराक संकटामुळे सेन्सेक्समध्ये घसरण

Next
>मुंबई : इराक संकट गंभीर होण्याच्या पाश्र्वभूमीवर कमजोर जागतिक कल आणि जूनचे डेरिव्हेटिव करार संपण्याआधीच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक आठवडय़ाच्या उच्चंकी पातळीवरून बुधवारी 55 अंकांनी घसरला. यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स 25,313.74 अंकांवर बंद झाला.
बाजार जाणकारांनी सांगितले की, कमी मान्सूनच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये असंमजसपणाचे वातावरण आहे. यामुळे अन्नधान्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. तेल शुद्धीकरण, भांडवली वस्तू, बँकिंग तथा एफएमसीजी खंड यांच्या शेअरला चांगली मागणी राहिली. वाहन, औषध, बांधकाम आणि टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्या कंपनीच्या शेअरमध्ये नफेखोरी दिसून आली.
सकारात्मक कल घेऊन उघडलेला मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअरचा निर्देशांक मोठय़ा कंपन्यांच्या शेअरच्या मागणीने 55.16 किंवा क्.22 टक्क्यांच्या हानीसह 25,313.74 अंकांवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 25,274.39 ते 25,427.8क् अंकांदरम्यान राहिला. मंगळवारी सेन्सेक्स 337.58 अंकांनी उंचावला होता.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 1क्.95 अंक किंवा क्.14 टक्क्यांनी घसरून 7,569.25 अंकांवर आला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीची उच्च पातळी 7,589.25 अंक आणि खालची पातळी 7,557.क्5 अंकांवर राहिली. सेन्सेक्सवरील 3क् शेअरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजसह 14 कंपन्यांचे शेअर घसरले. 
एसबीआय, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, हीरो मोटोकार्प या कंपन्यांना लाभ झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Falling in the Sensex due to the Iraq crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.