महिला अत्याचारासाठी फाशीचीच शिक्षा हवी

By admin | Published: September 9, 2016 05:08 AM2016-09-09T05:08:50+5:302016-09-09T05:08:50+5:30

समाजात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातूनही एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले वाढत आहेत.

False education should be required for women atrocities | महिला अत्याचारासाठी फाशीचीच शिक्षा हवी

महिला अत्याचारासाठी फाशीचीच शिक्षा हवी

Next

मुंबई : समाजात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातूनही एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले वाढत आहेत. त्यामुळे अशा घटनांमधील आरोपींना फाशीचीच शिक्षा ठोठवावी, असे मत प्रीतीचे वडील अमरसिंग राठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तर अंकुर पनवारची आई कैलाश पनवार यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे. तर या प्रकरणी सीबीआय चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे.
अमरसिंग राठी म्हणाले, की माझ्या मुलीच्या अपराध्याला फाशीची शिक्षा मिळाली, यामुळे मला आनंदच झाला आहे. पण अशाप्रकारे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा ठोठावण्यात यावी. आता यापुढे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही योग्य आणि जलदगतीने न्याय द्यावा, अशीच मी अपेक्षा करतो. माझ्या मुलीने अखेरपर्यंत वेदना सहन केल्या. त्यामुळे आरोपीला अखेरपर्यंत अशाच वेदना मिळाव्यात. पनवारची आई कैलाश पनवार यांनी सांगितले, की ही केस इथेच संपत नाही. मी वरपर्यंत केस लढणार आहे. माझा मुलगा दोषी नाही. याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने द्यावेत, यासाठी गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या बाहेरच बसून राहीन.
प्रीती राठीची पार्श्वभूमी
घरची आर्थिक स्थिती बेताची असलेल्या २३ वर्षीय प्रीतीने स्वकष्टाने शिक्षण घेतले. तिला आयएनएस अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी मिळाली होती. सेवेत रुजू होण्यासाठीच ती दिल्लीवरून मुंबईला निघाली होती.
काय आहे खटला?
प्रीतीच्या करिअरचा आलेख सातत्याने चढता असल्याने प्रीतीच्या शेजारचे पनवार कुटुंबीय त्यांचा मुलगा अंकुरला सतत दोष देत होते. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करूनही तो बेरोजगार होता. आईवडीलांनी असा पिच्छा पुरविल्याने तो वैतागला होता. त्यामुळे त्याला प्रीतीचाही राग येत होता. सुरुवातीला त्याने प्रीतीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र प्रीतीने त्याला नकार दिला. त्यामुळे अंकुर अधिकच वैतागला. त्याने प्रीतीला मुंबईला जाऊ नकोस, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही दिली. मात्र प्रीतीने त्याकडे दुर्लक्ष केले. दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी तिने १ मे रोजी गरीबरथ एक्सप्रेस पकडली. प्रीतीवर सूड उगवण्यासाठी अंकुरही याच एक्स्प्रेसमध्ये चढला. त्यापूर्वीच त्याने दिल्लीहून सल्फ्युरिक अ‍ॅसिडची बाटली विकत घेतली होती. वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर गरीबरथ एक्सप्रेस थांबली. प्रीती प्लॅटफॉर्मवरून चालत असताना एक पांढरी टोपी आणि चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळलेला तरुण तिच्यासमोर उभा रािहला. त्याने त्याच्याजवळची अ‍ॅसिडची बाटली उघडली आणि प्रीतीच्या चेहऱ्यावर फेकली. सुरुवातीस प्रीतीला भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अ‍ॅसिडमुळे तिने डावा डोळा गमावला होता. तर उजव्या डोळ््याचीही दृष्टी कमकुवत झाली होती, तिची प्रकृती अधिक बिघडत होती. त्यामुळे तिला उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले तेथे १७ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते. अ‍ॅसिड पोटात गेल्याने तिची अन्ननलिका पूर्ण जळली होती. त्यातच तिचे फुप्फुसही निकामी झाले होते. सतत रक्तस्राव होत असल्याने तिला दररोज पाच ते सहा बाटल्या रक्त चढवावे लागत होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यातच हिमोग्लोबिन आणि मूत्रपिंडाचाही त्रास तिला सुरू
झाला. अखेरीस डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि प्रीतीचा मृत्यू झाला.


न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे
पनवारने केलेल्या कृत्याचे पडसाद समाजावर मोठ्या प्रमाणावर उमटत आहे. जर त्याला योग्य ती शिक्षा दिली नाही तर मुली घराबाहेर पडण्यास घाबरतील. कोणीही अ‍ॅसिड हल्ला करेल अशी भीती मुलींच्या मनामध्ये राहील.
या घटनेची कु्ररता बलात्काराच्या प्रकरणापेक्षा अत्यंत गंभीर आहे.
बलात्काराच्या केसमध्ये पीडितेला अज्ञात स्थळी नेऊन तीची ओळख गुप्त ठेवली जाऊ शकते. पण अ‍ॅसिड हल्ल्यात विद्रुप चेहरा आणि शरीरासह रहावे लागते. प्रीतीने ३० दिवस मृत्यूशी झुंज दिली मात्र तिला माहित नव्हते की या हल्ल्याचे परिणाम तिच्या चेहऱ्यावर कशाप्रकारे झाले आहे.
सरकारी वकिलांचा युक्तीवादाबाबत न्यायालयाने म्हटले की आरोपींना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप झालेला नाही. न्यायालयाने
म्हटले की, ही केस प्रेमप्रकरणाची नाही तर एकतर्फी प्रेमाची आहे. आरोपीला पीडितेबरोबर विवाह करायचा होता मात्र तिने प्रस्ताव फेटाळल्याने त्याने तिला संपवून टाकले.
खटल्यातील अन्य साक्षीदारांच्या साक्षी लक्षात घेत न्यायालयाने म्हटले की, पनवारच्या
हातावर अ‍ॅसिडचे व्रण कसे आले? याचे स्पष्टीकरण देण्यात बचावपक्षाचे वकील अपयशी ठरले आहेत.


प्रीती राठी केस घटनाक्रम
८ मे ३०१३ : जीआरपीने नवी दिल्लीच्या नरेला येथे राहणाऱ्या पवन गेल्हानला अटक केली.
१९ मे २०१३ : प्रीतीची प्रकृती खालावली. अन्ननलिका निकामी झाली
२२ मे २०१३ : अ‍ॅसिड पोटात गेल्याने प्रीतीची फुफ्फुसे निकामी झाली.
३१ मे २०१३ : प्रीतीचे मूत्रपिंडही खराब झाले.
३ जून २०१३ : प्रीतीच्या वडिलांनी दिवसभर आंदोलन केले. त्याचदिवशी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले.
२ आॅगस्ट २०१३ : प्रीतीच्या वडिलांनी याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
९ आॅगस्ट २०१३ : गेल्हानला केवळ संशयाच्या आधारावर अटक केली आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने गेल्हानची जामिनावर सुटका.
२८ नोव्हेंबर २०१३ :तपास जीआरपीकडून मुंबई क्राईम ब्रँचकडे
२ जानेवारी २०१४ : अंकुर पनवार लागला. पोलिसांनी त्याला अटक केली.
४ एप्रिल २०१४ : पनवारला अटक केल्यानंतर ९० दिवसांनी १, ३३२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
१० आॅगस्ट २०१६ : अंतिम युक्तिवाद संपला.
६ सप्टेंबर २०१६ : अंकुर दोषी
८ सप्टेंबर २०१६ : न्यायालयाने पनवारला फाशीची शिक्षा ठोठावली.

 

Web Title: False education should be required for women atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.