महाडमध्ये कुटुंब वाळीत
By Admin | Published: March 2, 2015 02:12 AM2015-03-02T02:12:14+5:302015-03-02T02:12:14+5:30
गावातील व्यसनी मुलाबरोबर कुटुंबाच्या संमतीविना विवाह लावून देणारे गावकीचे प्रमुख, गाव मंडळाचे सदस्य यांना विरोध केल्याने जाधव कुटुंबाला वाळीत
जयंत धुळप, अलिबाग
गावातील व्यसनी मुलाबरोबर कुटुंबाच्या संमतीविना विवाह लावून देणारे गावकीचे प्रमुख, गाव मंडळाचे सदस्य यांना विरोध केल्याने जाधव कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार महाड तालुक्यातील कुंभार्डे-कदमवाडीत घडला आहे. गावकीने ठोठावलेला पाच हजार रुपये दंड भरूनही गावातून वाळीत टाकल्या प्रकरणी सदानंद दगडू जाधव यांनी महाड न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार २३ जणांविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या २३ जणांमध्ये कुंभार्डे गाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व गावकीचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाळ््या गोपाळ कदम, गावाच्या मुंबई मंडळाचा अध्यक्ष भिवा धोंडू कदम, सचिव अरविंद केशव कदम, मारुती तुकाराम कदम, रधुनाथ चंद्रू कदम, मधुकर धोंडू कदम, दिलीप रघुनाथ कदम, अरविंद मधुकर कदम, पांडुरंग भिवा कदम, दत्ताराम बाळू कदम, दीपक दत्ताराम कदम, मंगेश दत्ताराम कदम, सुलोचना दत्ताराम कदम, विश्वास तुकाराम कदम, अनंत पांडुरंग कदम, बाळकृष्ण पांडुरंग कदम, अंकुश अनंत कदम, सतिश गोविंद कदम, गोविंद सयाजी कदम, संदीप शांताराम कदम, राजू भिवा कदम, हरेश मनोहर कदम व प्रशांत कदम यांचा समावेश आहे.