आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंबियांनी करविले नेत्रदान

By admin | Published: March 7, 2016 07:04 PM2016-03-07T19:04:55+5:302016-03-07T19:04:55+5:30

नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नेत्रदान त्याच्या कुटुंबियांनी केले आहे.

The families of the suicides made by the farmer | आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंबियांनी करविले नेत्रदान

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंबियांनी करविले नेत्रदान

Next
>ऑनलाइन लोकमत
सिंदखेडराजा, दि. 7 - नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नेत्रदान त्याच्या कुटुंबियांनी केले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथील युवा शेतकरी संतोष भगूजी नागरे (वय ४० वर्षे) यांनी आज महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ८ वा. च्या सुमारास निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत नापिकी व कर्जबाजारीपणाचा उल्लेख आहे. शवविच्छेदनावेळी त्यांचे कुटुंबियांनी संमती दिल्याने त्यांचे नेत्रदान करण्यात आले.

Web Title: The families of the suicides made by the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.