आरोपीच्या कुटुंबाने सोडले गाव!

By Admin | Published: January 30, 2017 03:53 AM2017-01-30T03:53:58+5:302017-01-30T03:53:58+5:30

देवणी तालुक्यातील भोपणी येथील एका १८ वर्षीय तरूणीने गावातीलच तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती

The family of the accused left the village! | आरोपीच्या कुटुंबाने सोडले गाव!

आरोपीच्या कुटुंबाने सोडले गाव!

googlenewsNext

लातूर : देवणी तालुक्यातील भोपणी येथील एका १८ वर्षीय तरूणीने गावातीलच तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता छेडछाड करणाऱ्या तरुणाचे कुटुंबीय घर उघडे ठेवून बाहेरगावी गेल्याने पोलिसांनीच त्या घराला कुलूप लावले आहे.
भोपणी येथील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या रुपाली जवळदापके गेल्या अनेक दिवसांपासून गावातील तंटामुक्ती अध्यक्षाचा मुलगा संदीप दोडके हा छेड काढत होता़ अश्लील शेरेबाजी करणे, रस्त्यात अडवणे असे प्रकार करत त्याने रुपालीचा छळ सुरू केला होता़ याबाबत जवळदापके कुटुंबीयांनी संदीपच्या वडिलांकडे तक्रार केली होती़ मात्र संदीपची छेडछाड सुरूच राहिली.
शेवटी जवळदापके कुटुंबियांनी मुलीची शाळा बंद करून नात्यातील मुलाशी विवाह जुळविला़ तेव्हा संदीपने नियोजित पतीला मोबाईलवर जिवंत जाळण्याची धमकी दिली होती़ या सर्व प्रकाराला कंटाळून सोमवारी दुपारी रुपालीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी रुपालीच्या पित्याने मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलीस ठाण्यात संदीपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर दोडके कुटुंबीयांनीही भोपणी गाव सोडले आहे. हे कुटुंब कुठे गेले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The family of the accused left the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.