कुटुंब 10 वर्षानी पुन्हा तुरुंगात!

By admin | Published: July 12, 2014 01:58 AM2014-07-12T01:58:22+5:302014-07-12T01:58:22+5:30

दोषी ठरविल्याने सासू-सासरे, पती, दोन दीर व एक नणंद अशा नागपूरच्या सहाजणांच्या एका संपूर्ण कुटुंबास जन्मठेपेची राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी सुमारे 1क् वर्षानी पुन्हा तुरुंगातजावे लागणार आहे.

Family again in jail for 10 years! | कुटुंब 10 वर्षानी पुन्हा तुरुंगात!

कुटुंब 10 वर्षानी पुन्हा तुरुंगात!

Next
मुंबई : हुंडाबळी आणि विवाहितेचा छळ करणो या गुन्ह्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने अपिलात दोषी ठरविल्याने सासू-सासरे, पती, दोन दीर व एक नणंद अशा नागपूरच्या सहाजणांच्या एका संपूर्ण कुटुंबास जन्मठेपेची राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी सुमारे 1क् वर्षानी पुन्हा तुरुंगातजावे लागणार आहे.
प्लॉट क्र. 96, आदर्श कॉलनी, पोलीस लाईनच्या मागे, टाकळी येथे राहणारे शिवपूजन (सासरे), मालतीदेवी (सासू), राजेंद्र (पती), सुरेंद्र व वीरेंद्र (दोघे मोठे दीर) आणि अनिता मिश्र (विवाहित नणंद) असे हे कुटुंब आहे. या कुटुंबातील सून अनिता (पूर्वाश्रमीची अनिता रणछोड प्रसाद पांडे) हिचा हुंडाबळी घेणो (भादंवि कलम 3क्4 बी) आणि पती राजेंद्र यास हिरो होंडा मोटार सायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता तिचा छळ करणो (कलम 498ए) या गुन्ह्यांसाठी त्यांना ही शिक्षा भोगावी लागणार आहे. यापैकी शिवपूजन व वीरेंद्र पोलीस दलात नोकरीस आहेत.
विवाहाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या 1क् दिवस आधीच 8 एप्रिल 1999 रोजी अनिताचा सासरच्या घरी 98 टक्के भाजून मृत्यू झाला होता. त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर होती. त्याच दिवशी सकाळी अनिताचे वडील बाळंतपणासाठी तिला माहेरी नेण्यासाठी आले होते. पण सासरच्यांनी तिला पाठविले नव्हते. त्यानंतर तीनच तासांत ती भाजली होती.
या संदर्भात अनिताची आई चंद्रकांता पांडे यांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने 2क् जुलै 2क्क्5 रोजी अनिताच्या सासरच्या कुटुंबातील वरीलप्रमाणो सहाजणांना दोषी ठरवून शिक्षा दिल्या होत्या. परंतु त्याविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलाचा महिनाभरातच निकाल देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या सहाही आरोपींना ऑगस्ट 2क्क्5 मध्ये निदरेष मुक्त केले होते. त्यामुळे गेली सुमारे 1क् वर्षे हे सहाहीजण बाहेर होते. परंतु राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सुधांशु ज्योती मुखोपाध्याय व न्या. गोपाल गौडा यांच्या खंडपीठाने त्यांना हुंडाबळी व छळ या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवल्याने त्यांना राहिलेल्या शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
सत्र न्यायालयाने या सहाही आरोपींना अनिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठीही (कलम 3क्6) दोषी धरले होते. परंतु उपलब्ध पुराव्यांवरून अनिताने आत्महत्या केल्याचे सिद्ध होत नाही, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून निदरेष मुक्तता केली. (विशेष प्रतिनिधी)
 
च्विवाहितेचा झालेला मृत्यू ही आत्महत्या आहे व तिचा हुंडय़ासाठी छळ केला जात होता हे थेट पुराव्याने सिद्ध झाल्याखेरीज आरोपींना दोषी ठरविता येमार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. परंतु ते चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
 
च्विवाहितेचा लग्नानंतर सात वर्षात जळून किंवा अन्य प्रकारे अनैसर्गिक मृत्यू झाला व त्याआधी तिचा छळ होत असेल तर असा मृत्यू हुंडाबळी मानावा, असे कलम 3क्4 बीमध्ये गृहित धरलेले आहे. यासाठी मृत्युपूर्वी किती काळ आधी छळ झालेला असावा याचा कोणताही निश्चितकालावधी दिलेला नाही. अशाच गृहितकाची तरतूद इंडियन इव्हिडन्स अॅक्टच्या कलम 113मध्ये आहे. 

 

Web Title: Family again in jail for 10 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.