चोरडे गावातील कुटुंबाला टाकले वाळीत

By Admin | Published: April 1, 2016 12:31 AM2016-04-01T00:31:01+5:302016-04-01T00:31:01+5:30

मुरुड - जंजिरा तालुक्यातील चोरडे गावातील गणेश पाटील यांना या गावातील कोळी समाजातील मंडळींनी स्थानिक तहसीलदारांना मँग्रोज तोड व अवैधरीत्या रेती उत्खननाबाबत

The family of Chorde has been given away | चोरडे गावातील कुटुंबाला टाकले वाळीत

चोरडे गावातील कुटुंबाला टाकले वाळीत

googlenewsNext

रेवदंडा : मुरुड - जंजिरा तालुक्यातील चोरडे गावातील गणेश पाटील यांना या गावातील कोळी समाजातील मंडळींनी स्थानिक तहसीलदारांना मँग्रोज तोड व अवैधरीत्या रेती उत्खननाबाबत निवेदन देण्यास तयार केले होते. त्यावर गणेश पाटील (व्यवसाय मच्छीमारी) यांनी निवेदनावर सही करण्यास नकार या महिन्यातील पहिल्या आठवड्यात दिला. त्या रागाने गावपंचायतीचे अध्यक्ष मऱ्या पंची व अन्य चौदा जणांनी त्यांना बहिष्कृत केले. त्यांच्या कुटुंबाशी संबंध तोडले, शिवाय याबद्दल त्यांना दंड ठोठावण्यात आला. या प्रकाराची सर्व माहिती गणेश पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुरु वारी ( ३१ मार्च) त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावपंचायतीचे अध्यक्ष मऱ्या पंची, मसन्या पाटील, जगन्नाथ पाटील, विलास डोलकर, नरेश टावरी, जीवन डोलकर, हेमंत दुकले, संतोष कोटकर, आत्माराम पाटील, सदानंद दुकले, जीवन कोटकर, हशा टावरी, सतीश पाटील, बाळू टावरी, सुरेश पंची (सर्व रा. चोरडे, ता. मुरुड) यांच्यावर भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला असून कोणालाही अटक केली नाही. (वार्ताहर)

Web Title: The family of Chorde has been given away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.