कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

By admin | Published: February 13, 2017 03:21 AM2017-02-13T03:21:02+5:302017-02-13T03:21:02+5:30

नागपूरहून सुरतकडे जाणाऱ्या प्रेरणा एक्स्प्रेसखाली वडील व दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केली. शनिवारी रात्री होळ गावानजीक ही घटना घडली

Family group gang rape | कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या

Next

नरडाणा (जि. धुळे) : नागपूरहून सुरतकडे जाणाऱ्या प्रेरणा एक्स्प्रेसखाली वडील व दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केली. शनिवारी रात्री होळ गावानजीक ही घटना घडली असून रविवारी या रेल्वेमार्गालगतच्या विहिरीत बेपत्ता माय-लेकी आढळल्या. त्यात महिलेचा मृत्यू झाला तर मुलगी बचावली.
शनिवारी प्रेरणा एक्स्प्रेसखाली पिंटू आसाराम भिल (३५) त्यांची दोन मुले शिवदास (२१) व मोठाभाऊ (१८) यांनी आत्महत्या केली होती. भिल यांच्या पत्नी विठाबाई व मुलगी आक्का हे बेपत्ता झाले होते. त्या दोघी रात्री न आढळल्याने
रविवारी सकाळी पुन्हा त्यांचा शोध सुरू केला होता. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांना रेल्वेमार्गालगतच्या कोरड्या विहिरीत दोन्ही माय-लेकी आढळल्या. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सिसोदे यांनी दोराच्या सहाय्याने विहिरीत उतरून विठाबाई व अक्काबाई (१७) यांना बाहेर काढले. मात्र विठाबाई यांचा मृत्यू झालेला होता. अक्का हिच्यावर धुळे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूचे दुसरे काही कारण आहे, याचा शोध घेणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले. शनिवारी तीन जणांचा चिरडून मृत्यू झाला. त्याची पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद
आहे. घटनेची पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच याबाबत स्पष्टीकरण देता येऊ शकेल, असे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Family group gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.