ठाण्यातील कुटुंबाला हवे इच्छामरण, मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:07 AM2017-08-11T04:07:49+5:302017-08-11T04:07:54+5:30
नगरसेवक विक्रांत चव्हाण हे त्यांच्या हस्तकामार्फत खंडणीसाठी आपल्या संस्थेविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करून एका कुटुंबाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे बुधवारी इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र दिले.
ठाणे : नगरसेवक विक्रांत चव्हाण हे त्यांच्या हस्तकामार्फत खंडणीसाठी आपल्या संस्थेविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करून एका कुटुंबाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे बुधवारी इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र दिले. स्वाती मेहता असे पत्र पाठवणाºया महिलेचे नाव असून त्यांनी त्यांच्या व त्यांच्या बहिणीच्या कुटुंबातील नऊ जणांचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, नगरसेवक चव्हाण यांनी स्वाती मेहतांचे आरोप फेटाळले आहेत. मी स्वत: वकील आहे. स्वाती मेहता म्हणतात, तशा प्रवृत्तीचा
मी असतो, तर नागरिकांनी मला
तीन वेळा निवडून दिले नसते, असे स्पष्ट करून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
मुलुंड येथील स्वाती धवल मेहता यांनी यासंदर्भात मुख्य न्यायाधीश, मानवी हक्क आयोग, महिला आयोग आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मोठी बहीण मेघा गवारे ठाण्यात शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करतात. मेघा यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून साईनाथनगर, भीमनगर, जानकीदेवीनगर आणि गांधीनगर भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सर्वेक्षण केले होते. ही योजना राबवताना त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी चव्हाण हे अस्लम इसाक शरीक मसलत या त्यांच्या हस्तकामार्फत खोट्या तक्रारी करीत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे.
सूरज परमार प्रकरणात सहभाग
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील चिठ्ठीत चव्हाण यांचे नाव असल्याकडे त्यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. या दबावामुळे न्यायालयाकडून मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणीही त्यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. चव्हाण यांच्याकडून केली जाणारी बदनामी आणि त्यांच्या दबावतंत्राला कंटाळून आपल्या दोन्ही कुटुंबांना सामूहिक इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी मेहता यांनी केली आहे.