फॅन्सी नंबर प्लेटच्या दंडात सुधारणा हवी
By admin | Published: December 2, 2014 04:14 AM2014-12-02T04:14:19+5:302014-12-02T04:14:19+5:30
वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून शहरभर मिरविणाऱ्यांवर सध्या केवळ १०० रुपये दंड आकारला जातो. यामुळे वाहनचालकांमध्ये कायद्याची भीती निर्माण होत नाही
उस्मानाबाद : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी सोमवारी स्टेप अप्स आणि पुश अप्स या प्रकारांत तब्बल चार विक्रम नोंदविले़ या विक्रमांचे चित्रीकरण लंडन येथील वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ गिनीज बुक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर विश्वविक्रमाची अधिकृत घोषणा होईल.
सोमवारी सकाळी सासणे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली एक-एक करून हे चार विश्वविक्रम नोंदविले़ ते नोंदवित असताना सासणे यांनी प्रत्येक प्रकारानंतर पाच ते सात मिनिटे विश्रांती घेतली़ या विक्रमांचे चित्रीकरण लंडन येथील वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ गिनीज बुक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. हा विक्रम होत असताना उपस्थित खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिकांसह अधिकाऱ्यांनी देशभक्तीपर गगणभेदी घोषणा देत सासणे यांना दाद दिली़ (प्रतिनिधी)