पानसरे स्मृतिदिनानिमित्त ‘निर्भय बनो’ फेरी
By admin | Published: June 20, 2016 02:33 PM2016-06-20T14:33:50+5:302016-06-20T15:05:08+5:30
संपविला देह जरी.संपणार नाही मती.धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती.! असा आवाज सोमवारी कोल्हापुरात निघालेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या निर्भय बनो फेरीमध्ये दुमदुमला.
Next
धर्माच्या गारद्यांनो.कशी रोखणार गती.!
कोल्हापुरात पुरोगामींची विचारणा :
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २० - संपविला देह जरी.संपणार नाही मती.धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती.! असा आवाज सोमवारी कोल्हापुरात निघालेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या निर्भय बनो फेरीमध्ये दुमदुमला. निमित्त होते, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ निघालेल्या निषेध फेरीचे.
दरमहा शिवाजी विद्यापीठात निघणारी ही फेरी प्रथमच पानसरे यांच्या निवासस्थानापासून शिवाजी चौकार्पयत काढण्यात आली. त्यामध्ये सामाजिकचळवळीतील लोक मोठय़ा संख्येने उस्फूर्तपणो सहभागी झाले.सागरमाळ परिसरातील पानसरे यांच्या घरापासून सकाळी सात वाजता हे फेरी सुरु झाली. ती यादवनगर,गोखले कॉलेज,सावित्रीबाई फुले रुग्णालय,आझाद चौकातून बिंदूचौक मार्गे शिवाजी चौकात आली.
या दरम्यान ‘लाल सलाम. लाल सलाम’गोविंद पानसरे को लाल सलाम.लढेंगे तो जितेंगे..अशा घोषणा देण्यात आल्या. रणजित कांबळे, कृष्णात कोरे आदींनी चळवळींतील गाणी गात फेरीमध्ये चैतन्य आणले. पुरोगामी विचारांचा हा जागर ऐकून शहरवासियांचीही उत्सुकता ताणली. ही फेरी शिवाजी चौकात आल्यावर तिथे पानसरे-दाभोलकर व कलबर्गी यांचे स्मरण करणा:या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवशाहीर राजू राऊत व त्यांच्या सहका:यांनी पोवाडा म्हटला. रसिया प डळकर हिने इसलिय हम राह संघर्ष की चुने..हे गाणे म्हटले.फेरीमध्ये दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, नामदेव गावडे, उदय नारकर,एस.बी.पाटील,धनाजीराव जाधव, प्रा. रणधीर शिंदे, डॉ.चैतन्य शिपूरकर, निहाल शिपूरकर,सुजाता म्हेत्रे, प्रा. विलास पवार, छाया पवार, तनूजा शिपूरकर,सीमा पाटील, उमेश पानसरे, उमेश सुर्यवंशी, रमेश वडणगेकर,आर्किटेक्ट जीवन बोडके, सतिश पाटील, आदित्य खेबूडकर आदी सहभागी झाले.
पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : मेघा पानसरे
मेघा पानसरे यांनी या हत्याप्रकरणी सध्या सुरु असलेल्या तपासाबद्दल माहिती दिली. पानसरे हत्येचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. परंतू त्यांच्याकडून अजूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारने ती तयारी न दर्शवल्यास 23 जूनच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाकडे ही मागणी करणार असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले. या तिन्ही हत्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून जे म्हणत होतो, त्याच सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीसारख्या संस्थांचा सहभाग स्पष्ट होत आहे. परंतू पोलिसांना त्याबद्दल माहिती देवूनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप श्रीमती पानसरे यांनी केला.