अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:40 AM2022-02-08T06:40:24+5:302022-02-08T06:41:36+5:30

एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणली तर अनेकदा ते कोणत्या चित्रपटातील आहे किंवा ते कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित झाले आहे हे पटकन आठवतही नाही.

Fans upset over non-attendance of heroin at funeral, Whom Lata Mangrshkar gave voice’ | अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...!

अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी -
मुंबई
: लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या जोरावर अनेक अभिनेत्रींना नावलौकिक मिळाला. त्यांच्या अजरामर गाण्यांमुळे अनेक अभिनेत्रींची कारकीर्द बहरली, फुलली. आपल्यासाठी एक गाणे दीदींनी गावे म्हणून वाट्टेल ते करण्यासाठी तयार होणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी दीदींच्या अंत्यसंस्कार आणि अंतिम दर्शनाकडे मात्र पाठ फिरवली. ‘दिल दिवाना बिन सजना के...’ या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या भाग्यश्रीने दीदींच्या घरी भेट दिली. ऊर्मिला मातोंडकर, विद्या बालन, श्रद्धा कपूर आल्या. मात्र बाकीच्या आल्याच नाहीत, याची चर्चा प्रत्येकजण करत होता.

एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणली तर अनेकदा ते कोणत्या चित्रपटातील आहे किंवा ते कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित झाले आहे हे पटकन आठवतही नाही. मात्र हे गाणे लता मंगेशकर यांचे आहे असे सांगणारे लाखो सापडतील. अनेक अभिनेत्रींचे नाव केवळ अशा गाण्यामुळे इतिहासात लिहिले गेले. अमुक एखाद्या अभिनयासाठी लक्षात राहिलेल्या अभिनेत्री किती आणि गाण्यासाठी लक्षात राहिलेल्या किती? असा प्रश्न केला तर फार कमी अभिनेत्रींची नावे समोर येतील. हे केवळ लता मंगेशकर यांच्या जादूभऱ्या अनवट सुरावटींमुळे शक्य झाले. एकेका गाण्यासाठी त्यावेळी संगीतकार आणि गायक जी मेहनत घेत होते त्यामुळे हे साध्य झाले होते.

‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘दिल तो पागल है’, अशी सुंदर गाणी माधुरी दीक्षितला मिळाली. ‘मेरे ख्वाबो में जो आये...’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्यांनी काजोलची कारकीर्द बहरली. ‘आजा पिया तोहे प्यार दूं...’ गाण्यामुळे आशा पारेख, ‘कांटों से खींच के ये आँचल’ गाण्यासाठी वहिदा रहेमान, ‘होठों में ऐसी बात में दबाके चली आयी’ या गाण्यामुळे वैजयंतीमाला, ‘नाम गूम जायेगा’ गाण्यासाठी हेमा मालिनी लक्षात राहतात.

जया बच्चन कोरोनामुळे आजारी आहेत. मात्र अमिताभ बच्चन स्वत:च्या मुलीसह आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात व्यस्त व्यक्ती. ते आवर्जून आले. मात्र ज्यांच्यासाठी लता मंगेशकर यांनी स्वत:चा आवाज दिला त्यातील एकाही अभिनेत्रीला रविवारी लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनाला यावे वाटले नाही. यातल्या अनेक अभिनेत्री विविध चॅनलवर चालणाऱ्या गाण्यांच्या रिॲलिटी शोमध्ये अनेकदा दिसल्या. तिकडे जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळतो, मात्र त्यांना इकडे मात्र फिरकावे वाटले नाही, यासारखे दुर्दैव कोणते, अशा शब्दात अनेकांनी आपली खंत बोलून दाखवली आहे.

- गापूजी गापूजी : पूनम ढिल्लोन 
- आ जाने जा.., इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात : हेलन
- नीला आसमां सो गया : रेखा
- शीशा हो या दिल हो :  रीना रॉय
- रिमझिम गिरे सावन सुलग सुलग,  मुझे छु रही है :  मौसमी चॅटर्जी
- ए री पवन, ढूंढे तुझे मेरा मन : राखी
 

Web Title: Fans upset over non-attendance of heroin at funeral, Whom Lata Mangrshkar gave voice’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.