फरहान, श्रद्धा, अर्जुन, पुरब वेलकम इन औरंगाबाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 05:52 AM2016-11-04T05:52:20+5:302016-11-04T05:52:20+5:30
श्रद्धा कपूरसोबत अभिनेता अर्जुन रामपाल आणि पुरब कोहली यांचे चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास चार्टर्ड प्लेनने रॉक आॅन लाईव्ह कन्सर्ट परफॉर्मन्ससाठी लँडिंग झाले.
औरंगाबाद : ‘भाग मिल्खा भाग’ मधील मिल्खा सिंह, वजीरमधील दानिश अर्थात फरहान अख्तर आणि आशिकी-२ मधील अभिनेत्री आरोही म्हणजेच श्रद्धा कपूरसोबत अभिनेता अर्जुन रामपाल आणि पुरब कोहली यांचे चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास चार्टर्ड प्लेनने रॉक आॅन लाईव्ह कन्सर्ट परफॉर्मन्ससाठी लँडिंग झाले.
लोकमत प्रस्तुत व एम. के. कन्स्ट्रक्शन्स आणि ई-राईडस्च्या सहकार्याने मंगळवारी सायंकाळी ६ वा. जंबिदा इस्टेटच्या लॉन्सवर आयोजित केलेल्या रॉक आॅन कन्सर्ट या लाईव्ह शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी ‘रॉक आॅन’ ची टीम ‘चार्टर्ड प्लेन’ ने औरंगाबादेत दाखल झाली. चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिशय प्रसन्न मूडमध्ये आगमन झाले. या कलाकारांसोबत लोकमतचे एडिटोरियल बोर्डाचे डायरेक्टर ऋषी दर्डा हे मुंबईपासून सोबत होते. अरायव्हल अॅप्रोनमध्ये रॉक आॅनची टीम येताच त्यांचे लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी स्वागत केले.
>रिझर्व्ह लाऊंजमधून रॉक आॅनची टीम बाहेर पडल्यानंतर अर्जुन रामपालकडे सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन अर्जुन पुढे गेलेला मागे आला व सर्वांना बोलून ‘ले लो भाई सेल्फी चलो जल्दी करो’ असे म्हणत सर्वांची इच्छा पूर्ण केली.
>अष्टपैलू अभिनेता फरहान अख्तर याने करण यांना शेकहँड केले. तेथून ही टीम रिझर्व्ह लाऊंजमध्ये जाऊन फ्रे श होईपर्यंत शहरातील अनेक यंगस्टरची गर्दी विमानतळावर झाली. उत्सुकतेपोटी काहींनी तर विमानतळ प्रवेशाचे पासेस काढून आत गर्दी केली.