‘शेतमालाचे दर वाढले की सरकारला झोप येत नाही’
By admin | Published: April 10, 2016 02:55 AM2016-04-10T02:55:36+5:302016-04-10T02:55:36+5:30
शेतमालाची थोडी किंमत वाढली की केंद्र सरकारला झोप येत नाही. साखरेचे दर वाढले, की दर नियंत्रणात आणण्यासाठी बैठका सुरू होतात. परवा होणाऱ्या बैठकीत मीही जाणार आहे व शेतकऱ्यांची
सोमेश्वरनगर : शेतमालाची थोडी किंमत वाढली की केंद्र सरकारला झोप येत नाही. साखरेचे दर वाढले, की दर नियंत्रणात आणण्यासाठी बैठका सुरू होतात. परवा होणाऱ्या बैठकीत मीही जाणार आहे व शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहे. कारखान्यांचे कर्ज फिटेपर्यंत दोन वर्षे साखरेच्या दराबाबत गप्प बसा, अशी सूचना मी बैठकीत करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखाना स्थळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी साखर कारखानदारी अडचणीत होती. साखरेला दर नव्हता, एफआरपीसाठी कर्ज काढावे लागत होते. मात्र, आता साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत. पुढच्या वर्षी साखरेला रेकॉर्डब्रेक दर मिळणार आहे. (वार्ताहर)