शेतकरी, आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे व्रत

By admin | Published: March 14, 2016 02:29 AM2016-03-14T02:29:49+5:302016-03-14T02:29:49+5:30

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकरी, गोरगरीब आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे

Farmer, Adivasi children's fasting education | शेतकरी, आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे व्रत

शेतकरी, आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे व्रत

Next

नाशिक : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकरी, गोरगरीब आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. ही केवळ एक जबाबदारी नसून व्रत असल्याने प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने आपली भूमिका प्रामाणिकपणे जोपसाली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी येथे केले.
राज्य अध्यक्ष पारस ओस्तवाल, नंदकिशोर साखला, हस्तीलाल बंब, अमर गांधी, सुभाष घिया, संतोष मंडलेचा, सुनील चोपडा, रोशन टाटीया, ललित सुराणा हे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे होते. पारख म्हणाले, सर्व समाजहित आणि राष्ट्रनिर्मिती डोळ््यासमोर ठेवून भारतीय जैन संघटनेने विविध योजना, उपक्रम हाती घेतलेले आहेत.
मराठवाड्यातील आठ जिल्हे व यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची २७७ मुले व अमरावतीच्या मेळघाट, ठाणे जिल्ह्यातील कोसवाड येथील आदिवासींची सुमारे ३२२, अशी एकूण ६०० मुला-मुलींची शिक्षणाची जबाबदारी सध्या भारतीय जैन संघटना सांभाळत आहे. दरवर्षी नवीन ५० विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली जाते.
पुण्याच्या वाघोली येथे पाचवी ते बारावीपर्यंतच्या एक हजार विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी २०१४-१५ या कालावधीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा सर्व्हे करून १५ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा, असे आवाहनही पारख यांनी केले.
सदर अहवाल शासनाला सादर
करून जास्तीत जास्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व आदिवासींपर्यंत शिक्षणाची संधी पोहचविण्याचा मानस असल्याचेही पारख म्हणाले.
आठ वर्षांपासून जैन संघटनेने ‘बेटी बचाव’ उपक्रम हाती घेतला आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींबाबत ‘युवती सक्षमीकरण’ उपक्रमही राबविला जात आहे.
भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष पारस ओस्तवाल म्हणाले की, भारतीय जैन संघटनेसारखी ताकद, कार्यकर्त्यांची फळी सर्वांकडे असून सर्व समाजाने राष्ट्रनिर्मिती समजून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमर गांधी यांनीही या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer, Adivasi children's fasting education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.