शेतकरी बोगस बीटी बियाणांच्या मोहात!
By admin | Published: June 9, 2014 11:55 PM2014-06-09T23:55:02+5:302014-06-09T23:55:02+5:30
केरळमध्ये दाखल झालेला मान्सून काहीच दिवसांत विदर्भार्पयत पोहोचेल. त्यानुसार शेतक:यांनी बियाण्यांची जोमात खरेदी सुरू केली आहे.
Next
जीवन रामावत - नागपूर
केरळमध्ये दाखल झालेला मान्सून काहीच दिवसांत विदर्भार्पयत पोहोचेल. त्यानुसार शेतक:यांनी बियाण्यांची जोमात खरेदी सुरू केली आहे. याच पाश्र्वभूमीवर बोगस बीटी बियाणो बाजारात मोठय़ा प्रमाणात दाखल झाले आहे. यात बीजी-3 (आरआर) या कापूस बियाण्याची जोरदार चर्चा आहे. बीजी-3 या बियाण्याला अजूनर्पयत केंद्र सरकार व जेनेटिक इंजिनिअरिंग अॅडव्हायझरी कमिटीकडून विक्रीची परवानगी मिळालेली नाही.
नागपूर विभागात यंदा सुमारे 3 लाख 78 हजार 35क् हेक्टरमध्ये सोयाबीनची, तर 3 लाख 24 हजार 7क्क् हेक्टरमध्ये कापसाची लागवड होणार आहे. यासाठी 2 लाख 83 हजार 47क् क्विंटल सोयाबीन व 8 हजार 168 पाकीट बीटी कापूस बियाणो लागणार आहे. बोलगार्ड या कंपनीने आतार्पयत बीजी-1 व बीजी-2 हे दोन वाण बाजारात आणले आहेत, शिवाय बीजी-3 संशोधन प्रक्रियेत
आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बीजी-1 व बीजी-2 या दोन्ही वाणांची उत्पादन क्षमता अधिक असली तरी त्यावर कोणतेही तणनाशक मारता येत नाही. त्यामुळे बीजी-3 हे वाण विकसित करण्यात आले आहे. यावर तणनाशकाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असे मानले जाते. त्यामुळेच या वाणाला राऊंड ऑफ रेजिस्टंट (आरआर) या नावानेही ओळखले जाते. अलीकडे शेतक:यांमध्ये या बियाण्याची फार मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे; परंतु या बियाण्याच्या विक्रीला अजूनर्पयत परवानगी मिळालेली नाही.
सध्या बीजी-3 बियाणो संशोधन व मंजुरी प्रक्रियेत आहे. मात्र काही बियाणो विक्रेते जाणीवपूर्वक या बियाण्याचा प्रचार करून, त्याची चोरटय़ा मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली
आहे.
कृषी विभाग अशा विक्रेत्यांचा कसून शोध घेत आहे. यातच कृषी विभागाने दोन दिवसांपूर्वी सेलू तालुक्यातील बोधली व पुसद येथून बोगस बीटी बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. कृषी विभागाने यंदा बोगस बीटी बियाण्यांविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली
जाते.
कृषी विभागाने हा काळा बाजार रोखण्यासाठी आठ भरारी पथके नेमली आहेत; मात्र तरीही काळा बाजार सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
4पश्चिम विदर्भात बियाण्यांचा काळा बाजार सुरू असून, अकोला जिल्हय़ातही अप्रमाणित बीटी कापूस व सोयाबीनचे बियाणो विक ले जात आहे; परंतु अकोल्याचा कृषी विभाग सुस्त असल्यामुळे, शेतक:यांना आर्थिक
भरुदड सोसावा लागत आहे.
बीजी-3 बियाण्याच्या विक्रीला अजूनर्पयत मान्यता नसल्याने या बियाण्याच्या नावाखाली शेतक:यांना बोगस बियाणो विक्री करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणीही अशा बियाण्याच्या मोहात पडू नये. गावात फिरणा:या कोणत्याही एजंटकडून
बीटी बियाण्याची खरेदी न करता अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणो खरेदी करावे.
-ज्ञानेश्वर तसरे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी