...तू सांभाळून घे म्हणत मोठ्या भावाची आत्महत्या; विष प्राशन करुन शेतकऱ्याने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 03:52 AM2020-10-16T03:52:54+5:302020-10-16T07:05:10+5:30

पीरबावडा परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होत असल्याने रामेश्वर चिंतेत होता

The farmer ended his life by consuming poison at Aurangabaad | ...तू सांभाळून घे म्हणत मोठ्या भावाची आत्महत्या; विष प्राशन करुन शेतकऱ्याने जीवन संपवले

...तू सांभाळून घे म्हणत मोठ्या भावाची आत्महत्या; विष प्राशन करुन शेतकऱ्याने जीवन संपवले

googlenewsNext

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : मला कर्ज फेडणे शक्य नाही, भावा ते सांभाळून घे, असे लहान भावाला फोनवर सांगत रामेश्वर तेजराव लहाने या तरुण शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी आपल्याच शेतात विष प्राशन करीत आपले जीवन संपवले.

त्याने फोन केल्यानंतर कुटुंबात सर्वांचीच धांदल उडाली व विष प्राशन केलेल्या रामेश्वरला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पीरबावडा परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होत असल्याने रामेश्वर चिंतेत होता. त्याला आई -वडील दोन भाऊ व चार बहिणी आहेत व फक्त सहा एकर कोरडवाहू शेती आहे. त्यातच कोरोना संकटात एका बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतले. आता अवकाळी पावसामुळे कर्जाची फेडण्याविषयीची चिंता त्याला सतावत होती. या चिंतेतूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

Web Title: The farmer ended his life by consuming poison at Aurangabaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.