Farmer Suicide: अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:44 AM2022-08-22T08:44:28+5:302022-08-22T09:15:32+5:30

Farmer Suicide: विदर्भात यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली.

Farmer Suicide: Many 'Ganesh Madkars' are on the verge of suicide, Shiv Sena asks the government for farmer suicide of maharashtra | Farmer Suicide: अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल

Farmer Suicide: अनेक 'गणेश माडेकर' आत्महत्येच्या टोकावर?, शिवसेनेचे सरकारला अ'नेक' सवाल

Next

मुंबई - महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळताच, शेतकरी महाराष्ट्राला आत्महत्यामुक्त करायचा संकल्प नवनियुक्त सीएम एकनाथ शिंदेंनी केला. मात्र, शिंदेंच्या या संकल्पा सत्यात कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे. कारण, महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांत 100 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, दोनच दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात एका बळीराजाने चक्क विद्युत तार तोंडात घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेनंही सरकारच्या धोरणावरुन टिका करत शेतकऱ्यांसंदर्भातील अ'नेक' सवाल शिंदे सरकारला केले आहेत. 

विदर्भात यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानीची सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर केंद्रीय पथक तर शुक्रवारी राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी पाहणी केली. हवालदील शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा असल्याच्या पार्श्वभूमीवरच भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे पुढे आले आहे. गणेश श्रावण माडेकर (३६) रा. पढेगाव असे मृत्यूस कवटाळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या ह्रदय पिळवून टाकणाऱ्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुखपत्रातून शिंदे सरकारवर टिका केली आहे. तसेच, शेतकरी आत्महत्येच्या टोकावर असल्याचे सांगत अनेक सवालही केले आहेत. 

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होऊनही प्रत्यक्ष आर्थिक मदत जर शेतकऱ्याच्या पदरात पडत नसेल तर त्याने जगायचे कसे? झालेले नुकसान सोसून पुढच्या हंगामासाठी जिद्दीने उभे राहायचे कसे? हवालदिल शेतकऱ्यांना तुमचे दौरे नकोत, आर्थिक मदत हवी आहे. 'एनडीआरएफ' पेक्षा दुप्पट मदतीच्या गमजा मारल्या ना? मग आता ती देताना हात का आखडले आहेत?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार ते दीड लाखापर्यंत मदतीची गरज असताना जेमतेम साडेतेरा हजार रुपये तुम्ही जाहीर केले. पुन्हा तेदेखील तुम्ही देत नसाल तर हे पाप आहे. त्यामुळे हताश झालेले अनेक 'गणेश माडेकर ' आज राज्यात आत्महत्येच्या टोकावर आहेत. हे दुसरे पाप आहे. कुठे फेडणार हे पाप? घोषणा जोरात, सरकार कोमात आणि बळीराजा मृत्यूच्या दारात एवढी भयंकर अवस्था महाराष्ट्राची कधीही झाली नव्हती, अशा शब्दात शिवसेनेकडून शिंदे सरकावर टिकेचे बाण सोडण्यात आले आहेत. 

माडेकर कुटुंबाने जगायचं कसं?

महाराष्ट्रात सध्या पावसाबरोबरच राज्यकर्त्यांच्या घोषणांचाही पाऊस रोजच पडत आहे. बळीराजाच्या नावानेही काय कमी घोषणा विद्यमान सरकारने केल्या? पण घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी सगळी स्थिती आहे. त्यामुळे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला बळीराजा मदतीविना कोरडाच आहे आणि हवालदिल हेऊन मृत्यूला कवटाळीत आहे. वर्धा जिल्हय़ातील सावंगी (मेघे) जवळ असलेल्या पढेगाव येथे तर गणेश माडेकर या तरुण शेतकऱ्याने थेट प्रवाहित विजेची तारच तोंडात धरून जीवनयात्रा संपवली. गणेश यांचे वयोवृद्ध माता-पिता, पत्नी आणि दोन कच्ची-बच्ची यांनी आता कसे जगायचे? हे सगळं भयंकर आहे. मात्र त्यापेक्षाही भयंकर फक्त 'कोरडे' पाहणी दौरे आणि पोकळ घोषणा यात मग्न असलेले राज्यातील सरकार आहे. गणेश यांना शासकीय नुकसानभरपाई वेळेत मिळाली असती तर कदाचित त्यांनी टोकाचे पाऊल उचलले नसते. मात्र तसे घडले नाही.

Web Title: Farmer Suicide: Many 'Ganesh Madkars' are on the verge of suicide, Shiv Sena asks the government for farmer suicide of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.