Maharashtra Election 2019 : ‘शेतकरी आत्महत्या आघाडी सरकारमुळेच’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 05:38 AM2019-10-17T05:38:08+5:302019-10-17T06:52:44+5:30
भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले.
मुंबई : विदर्भ, मराठवाडा या कृषी सिंचनाच्या सुविधा नसलेल्या भागांत शेतकऱ्यांच्या गेल्या काही वर्षांत आत्महत्या झाल्या. सिंचनसुविधा निर्माण न करता, घोटाळे करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार असल्याची टीका केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केली.
भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले. शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शेतीच्या शाश्वत विकास सुरू केला आणि विक्रमी सिंचन सुविधा निर्माण केल्या. आघाडी सरकारला १५ वर्षांत जमले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले.
मोदींच्या सभेसाठी झाडे नियमानुसारच तोडली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथील बुधवारच्या सभेसाठी स.प.महाविद्यालयाच्या मैदनातील झाडे तोडण्यावरून एवढी टीका कशासाठी, असा सवाल करतानाच प्रकाश जावडेकर यांनी झाडे तोडताना त्यापेक्षा पाचपट पर्यायी झाडे लावण्याचा नियमच आहे. त्यानुसार, कार्यवाही झाली असेल, तर आक्षेपाचे कारण नाही, असे मत मंगळवारी येथे व्यक्त केले.
पत्रपरिषदेत जावडेकर म्हणाले की, या आधीही पंतप्रधान वा अन्य नेत्यांच्या जाहीर सभांसाठी झाडे तोडण्यात आली आहेत. पुण्याच्या मैदानावर झाडे कापताना नियमांचे पालन झालेले आहे. असे असताना उगाच टीका केली जात आहे. या आधी तसे घडलेले नव्हते.